मंगळवार दिनांक २८ सप्टेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख तथा राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन,मावळ लोकसभा खासदार श्रीरंग आप्पा बारणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड पनवेल शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली व पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे तसेच पनवेल विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकुर यांच्या विशेष प्रयत्नांने ,कलंबोली शहरातील पनवेल शहर राष्ट्रवादी उपाध्याक्ष व धनगर समाजाचे नेते तसेच उद्योजक आबासो रामचंद्र लकडे यांच्यासह शेकडो समर्थकांनी शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश करून, हाती शिवबंधन बांधून घेतले.

त्याप्रसंगी शिवसेना पनवेल उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, महानगर प्रमुख रामदास शेवाळे, तालुका प्रमुख एकनाथ म्हात्रे, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील, उपमहानगर प्रमुख दिपक घरत, आत्माराम गावंड, प्रकाश चांदीवडे, शहरप्रमुख डि.एन. मिश्रा,प्रदीप केणी, शहर समन्वयक गिरिष धुमाळ, शहर संघटक अक्षय साळुंखे, उपशहर प्रमुख सूर्यकांत म्हसकर, नारायण फडतरे विभाग प्रमुख पद्माकर पाटील, महेश गुरव, आकाश शेलार आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.