आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याने महसूल विभाग यांच्या कडू नागरिकांच्या सुविधेसाठी विविध दाखले वाटप ….
प्रतिनिधी कोकण डायरी:-
शिबिराची सुरवात खारघर येथे करून 17 सप्टेंबर रोजी सुकापूर येथील लक्ष्मी पब्लिक स्कूल येथे शिबीर ठेवण्यात आले .या शिबिराचे उदघाटन भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी केले. तसेच या ठिकाणी दाखले वाटपा बरोबर कोविशिड लस देणे, तसेच आधार कार्ड , विविध दाखले बनवण्याची ही कामे केली गेली आणि यापुढे कळंबोली, आजीवली ,कामोठे ,गव्हाण येथे ही शिबीर होणार आहे अशी माहिती दिली.
सुकापूर येथील शिबिराला पनवेल भाजपा चे तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, जि प सदस्य अमित जाधव, माजी जि प सदस्य राजेंद्र पाटील ,सरपंच योगिता राजेश पाटील, लक्ष्मी स्कूल संस्थापक ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद भगत,दिव्येश भगत, ज्ञानेश्वर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.