गुरु गुरूमित राम रहीम गादी महिना च्या निमित्त गोरगरीब आदिवासी गरजू बांधवांना किराणा सामानाचे वाटप
रसायनी /कोकण डायरी:- पुज्य गुरु संत डॉ.गुरुमीत राम रहीम सिंह जी इंसा यांच्या गुरु गादी महिन्याच्या औचित्य साधून दिनांक19 सप्टेंबर 2021 डॉ. गुरुमित राम रहीम इंसा यांच्या कडून विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते असते.
यामध्ये निराधार मुलींचे लग्न, रक्तदान ,अन्नदान ,गोरगरिबांना किराणा सामान गरजू विद्यार्थ्यांना पुस्तक पेन व स्कूल बॅग चे वाटप, निराधारांना घर बांधून देणे ,असे शंभर कार्यक्रम वर्षभर राबवीत असतात या सामाजिक कार्यक्रमाचा भाग म्हणून संत डॉ. गुरुमित राम रहीम चा भक्तांकडून शाह संत नामजी परमसुख आश्रम कलोते मोकाशी ता . खालापूर येथे पंधरा गरजू गरीब आदिवासी परिवारांना एक महिन्याचे जीवनावश्यक किराणा सामानाचे वाटप करण्यात आले संत गुरु मीत डॉ. राम रहीम सचा सौदा च्या 45 गुरुदयाल इंसा यांनी आपल्या स्वखर्चाने हे सामान गोरगरीब परिवारांना वाटप करण्यात आले यावेळी पंजाब हरियाणा येथून आलेले भक्त जगरूप इंसा, हरचरण इंसा, ब्रह्माचारी बंता इंसा ,कृष्णकुमार कुंडू सतविर इंसा, जनार्दन हिंसा, सतपाल इंसा ,राकेश इंसा ,पुरणमल सुरजीत इंसा व महिला भक्त अनु, सुनिता ,मोनिका, शालिनी, कामिनी इंसा .आधी भक्त गणासह गोरगरीब आदिवासी बांधव उपस्थित होते यावेळी गोरगरीब गरजू आदिवासी बांधवांच्या परिवारांने संत डॉ. गुरु राम रहीम इंसा भक्तांचे आभार मानले.