लोकनेते रामशेठ ठाकूर, कामगार नेते महेंद्र घरत यांनीही दिल्या शुभेच्छा
गेली २५ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे पनवेलमधील जेष्ठ पत्रकार संजय कदम यांचा वाढदिवस पनवेल तालुक्यातील पत्रकारांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारीता क्षेत्रात संजय कदम यांचे मोठे योगदान आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी अनेक नागरी समस्या प्रशासनासमोर मांडून अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचे काम लेखणीच्या माध्यमातून सुरूच ठेवले आहे. गुन्हे जगतातील घडामोडी आणि संजय कदम हे एक पनवेल तालुक्यातील स्वतंत्र समीकरण मानले जाते. पत्रकारीतेमधून समाजहिताच्या बातम्या लोकांपर्यंत पोहचवत असताना आजपर्यंत त्यांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. आज (मंगळवार दि.१४ सप्टेंबर) त्यांच्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, रायगडचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, नगरसेवक राजू सोनी, युवानेते पवन सोनी, वादळवाराचे संपादक ज्येष्ठ पत्रकार विजय कडू, पनवेल टाइम्सचे संपादक ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी, कोकण डायरीचे संपादक सय्यद अकबर, महाराष्ट्र टाईम्सचे कुणाल लोंढे, दै.पुण्यनगरीचे साहिल रेळेकर, टीव्ही ९ चे हर्षल भदाणे, रायगड संदेशचे संपादक विशाल सावंत, रायगड टुडेचे संपादक क्षितिज कडू, प्रवीण मोहोकर, असीम शेख, साबिर शेख, इरफान शेख, विकास पाटील, अनिल राय, लक्ष्मण ठाकूर, ॲड शुभांगी लाड, सुधीर पाटील, विक्रम येलवे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.