नवी मुंबईचे डॉ. एलिस जयकर यांचा मुळे नवी मुंबईला आणखी एक राष्ट्रीय स्थर अभिमान मिळाला आहे. डॉ. एलिस यांची भारताचे सर्वात मोठी ख्रिश्चन संस्था ख्रिश्चन एकता मंचचे राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. एलिस यांची नियुक्ती ख्रिश्चन एकता मंचचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष, डॉ. प्रभुदास दुप्ते, राष्ट्रीय अध्यक्ष, महिला सेल सुशीला पल्लीचा, राष्ट्रीय सहसचिव विश्वास भोसले आणि दिल्ली प्रदेश अध्यक्ष डॉ. जोशुआ गमांगो यांच्या द्वारे करण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान बोलताना डॉ. दुप्ते यांनी व्यक्त केले, “डॉ. एलिस भूतकाळात वेगवेगळ्या संप्रदायासह काम करत आहेत आणि आम्हाला खात्री आहे की ते आमचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून राष्ट्रीय स्तरावर अधिक प्रभाव पाडू शकतील.”
डॉ. एलिसला भारतभरातील विविध संस्थांकडून कौतुक आणि सदिच्छा प्राप्त झाली, विशेष करून कॅप्टन इब्राहिम पाटणकर, सचिव, मुस्लिम कल्याण आणि शैक्षणिक ट्रस्ट, सय्यद अकबर, उपाध्यक्ष, भाजपा अल्पसंख्यांक सेल, महाराष्ट्र राज्य, रामचंद्र आबा दळवी, सरचिटणीस, काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश, माजी आमदार संदीप नाईक, निवृत्त आयएएस अधिकारी आणि शिवसेना नेते विजय नाहटा, डॉ बेनी प्रसाद, संगीतकार आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर, मायकेल फर्न्स, संस्थापक अध्यक्ष गोवा नागरिक कल्याण ट्रस्ट, मंजुला हिरेमठ, सचिव, शरण संकुला चॅरिटेबल सोसायटी, नवी मुंबई, जसपाल सिंह नेओल, पर्यावरणवादी आणि इतर.