(प्रतिनिधी) जगभरात दीड करोड लोकांमध्ये अंधत्वाचे प्रमाण आढळून येते यामध्ये पन्नास टक्के रुग्णांना मोतीबिंदू मुळे अंधत्व येत असल्याचे आढळून येते.

हीच बाब लक्षात घेता आदित्य ज्योत रुग्णालय व अग्रवाल ग्रुप यांनी मिळून महाराष्ट्रातील रुग्णांना डोळ्यांचा संबंधित आजारांवर उपचार उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्रात विविध शहरांमध्ये अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आय केअर सेंटर उभारण्याची घोषणा केली आहे.


भारतातील आघाडीच्या आय केयर चेनने जगभरातील आपले अस्तित्व विस्तारण्यासाठी १००० कोटी रुपयांची विस्तार योजना आखली असून त्याअंतर्गत पुढील ३ वर्षांत १०० नवीन हॉस्पिटल्स, ५०० व्हिजन सेंटर्स तसेच दमदार डिजिटल अस्तित्व तयार केले जाणार आहे.

डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटलद्वारे पुढील १८ ते २४ महिन्यांत मुंबई व उर्वरित महाराष्ट्रात २० आय केयर सेंटरच्या माध्यमातून सुविधा देण्यासाठी ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली.
पदमश्री प्रो.डॉ.एस.नटराजन यांनी स्थापन केलेल्या मुंबईतील आदित्य ज्योत हॉस्पिटल या आघाडीच्या आय- केयर सुविधांपैकी एका हॉस्पिटलचे डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटलमध्ये विलिनीकरण करण्यात आले असून ती देशातील आय हॉस्पिटल चेनमधील १०० वी शाखा ठरली आहे.

मुंबईतील आघाडीच्या नेत्रसुविधांमध्ये गणले जाणारे आदित्य ज्योत हॉस्पिटलचे आता डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटल मध्ये विलिनीकरण झाल्या मुळे आदित्य ज्योत हॉस्पिटल या साखळीचा भाग झाला असुन भारत व परदेशातील नेत्र सुविधा केंद्रांची संख्या आता १०० वर गेली असल्याचे सांगण्यात आले.

अग्रवाल ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्रात ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून पुढील ३ वर्षांत २० आय हॉस्पिटल्स व १०० आउट रीच क्लिनिक्स उभारण्याची योजना देखील आखण्यात आली आहे.
यापूर्वी, अग्रवाल आय हॉस्पिटल ने नवी मुंबईतील अडव्हान्स आय हॉस्पिटल आणि आयुष आय क्लिनिक, चेंबूर यांच्यासोबत भागिदारी करून
नाशिक, कोल्हापूर, नागपूर, सोलापूर, पुणे, औरंगाबाद आणि जळगाव अशा शहरांत विस्तार करत महाराष्ट्रातील लोकांना दर्जेदार नेत्र सेवा देण्याचे ठरवले असून याकरिता १००० कोटी रुपयांची विस्तार योजना आखली आहे त्याअंतर्गत पुढील तीन वर्षांत भारतात २०० हॉस्पिटल्सपर्यंत विस्तारण्याचे व त्याचबरोबर ५०० आउटरीच सेंटर्स उभारण्याचे ठरवले असून या माध्यमातून याआर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या रुग्णांना देखील उपचार देण्याचा मानस असल्याचे यावेळी, पत्रकारांशी बोलतांना सांगितले

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.