पनवेल दि.१३ (वार्ताहर): पनवेल परिसरात सुरू असलेल्या बारमध्ये नियमाचे उल्लंघन सुरू असल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसात तळोजा येथील चंद्रवीलास बार आणि पनवेल येथील टोपाझ बार वर कारवाई करत एकूण 71 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मध्यरात्री अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पराग सोनवणे आणि त्यांच्या टीमकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यांनाा नोटीस सुद्धा बजावण्यात आली आहे. आधी पनवेल तालुक्यातील साई निधी टोपाझ बार वर कारवाई केल्यानंतर तळोजा येथील चंद्रवीलास बार वर आणि नंतर तळोजा येथील चंद्रवीलास बार पोलिसांनी कारवाई करत ग्राहक आणि होटेल स्टाफवर गुन्हे दाखल केले आहे.
पनवेल परिसरात सुरू असलेल्या बारमध्ये नियमाचे उल्लंघन सुरू असल्याचे दिसून येत आहे. पनवेल तालुक्यातील साई निधी टोपाझ बार वर कारवाई केल्यानंतर तळोजा येथील चंद्रवीलास बार वर दिनांक 12 सप्टेंबर च्या मध्यरात्री अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पराग सोनवणे आणि त्यांच्या टीमकडून कारवाई करण्यात आली आहे.त्यांनाा नोटीस बजावण्यात आली आहे.
गुप्त पद्धतीने चालू करून शासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तब्बल 39 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी पनवेल तालुक्यातील कोन येथे साई निधी टोपाझ बार वर याच पथकाने कारवाई केली होती.
१० सप्टेंबर रोजी टोपाझ बार विहित वेळेत बंद करून ग्राहकांसाठी गुप्त पद्धतीने पुन्हा चालू केले असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष गुन्हे शाखा नवी मुंबई यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने या ठिकाणी धाड टाकली. यावेळी साई निधी टोपाझ बार सुरू असल्याचे निदर्शनास आले. शासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करत असल्याने याप्रकरणी १४ महिला वेटर, नऊ ग्राहक आणि नऊ पुरुष वेटर मॅनेजर यांच्यासह ३२ जणांवर कारवाई करण्यात आली होती. त्यांना नोटीस बजावण्यात आली आ. या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात बत्तीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आम्हाला मिळालेल्या माहिती नुसार आम्ही बार ठिकाणी पोचलो . बार बाहेरून बंद करून ग्राहकांसाठी गुप्त पद्धतीने सुरू असल्याचे निदर्शनास आले . आम्ही नियमानुसार कारवाई करत तळोजा पो स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे.
पराग सोनावणे , व पो निरीक्षक- अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष