नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील तुर्भे विभागा अंतर्गत श्री. सुरेश रामचंद्र कदम, रुमनं. डी – 107, सेक्टर – 4, सानपाडा, नवी मुंबई यांनी महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे G+1 मजल्याचे अनधिकृत बांधकाम सुरुहोते. सदर अनधिकृत बांधकामास महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, 1966 चे कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती. परंतु, सदर ठिकाणी संबंधितांनी अनधिकृत बांधकाम सुरुच ठेवले होते.

सदर अनधिकृत बांधकामावर तुर्भे विभाग कार्यालया मार्फत तोडक कारवाईच्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सदर ‍मोहिमे अंतर्गत सदर अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आलेले असुन सदर मोहिमेसाठी तुर्भे विभागातील अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. ‍तसेच अतिक्रमण निर्मुलन पथकातील पोलीस अधिकारी/अंमलदारतैनात होते.

या मोहिमेकरीता 10 मजुर, 02 इलेक्ट्रीक हॅमर, 06 हातोडे यांचा वापर करण्यात आलेला आहे.सदर अनधिकृत बांधकाम निष्कासन कारवाई पोटी रक्कमरु. 25,000/- इतकी दंडात्मक वसुली देखील करण्यात आलेली आहे.

तसेच यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येईल.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.