सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उदघाटन

पनवेल (प्रतिनिधी) सेवा व समर्पण अभियानाअंतर्गत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील प्रदर्शनीचे आयोजन खारघरमध्ये करण्यात आले आहे. लिटील वर्ल्ड मॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय प्रदर्शनीचे पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते आज (शनिवार, दि. ०९) उद्घाटन करण्यात आले. या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी आपले जीवन सर्मपीत केले असून,  देशाच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य मोलाचे आहेत. त्यामुळे नागरीकांनी या प्रदर्शनीमधून प्रेरणा घ्यावी असे प्रतिपादन केले.
सेवा व समर्पण अभियाना अंतर्गत भारतीय जनता पार्टी खारघर मंडळातर्फे लिटील वर्ल्ड मॉलमध्ये ९ आणि १० ऑक्टोबर दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील प्रदर्शनीचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाचे पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले तसेच या वेळी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांचा सन्मान प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. या वेळी  पनवेल महापालिकेचे नगरसेवक अभिमन्यू पाटील, ऍड.नरेश ठाकूर, रामजी बेरा, नगरसेविका आरती नवघरे, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस किर्ती नवघरे, दीपक शिंदे, भाजप युवा मोर्चा खारघर व तळोजा मंडल अध्यक्ष विनोद घरत, जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्ष संध्या शारबिद्रे, जिल्हा चिटणीस गिता चौधरी, मोना आडवाणी, विपुल चौटालीया. संजय घरत, शोभा मिश्रा, संजय बागडे, अक्षय पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.