कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाउन मध्ये अनेकांचा रोजगार हिरावला गेला. आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने छोट्या व्यापारांवर मोठं आर्थिक संकट उभं राहील होत. अश्या व्यावसायिकांना पुन्हा उभारी देण्यासाठी त्यांना सवलतीच्या दरात १० हजारांपर्यंत कर्ज उपलब्ध प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत करण्यात आलं. स्वनिधी योजनेची अंमलबजावणी जून २०२० पासून सुरु करण्यात आली.
बँकींग उद्योगात अग्रणी असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रने ह्या स्वनिधी योजनेच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतलेला आहे. बँकेच्या नवी मुंबई झोनचे झोनल मॅनेजर मा. सुरेंद्र देवकर जी यांनी आपल्या नवी मुंबई झोनच्या सर्व शाखांना स्वनिधी योजनेची अंमलबजावणी करावी अशा सूचना केल्या व गरजू फेरीवाल्यांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
त्यानुसार नवी मुंबई झोनच्या वाशी, अलिबाग, सीवूड, खारघर, पनवेल, तुर्भे, नवीन पनवेल, सी.बी.डी. बेलापूर, पळस्पा, आर.ए.ई.बेलापूर आदी शाखेच्या शाखा प्रबंधक व अधिकारी यांनी फेरीवाल्यांच्या स्टॉल वर भेटी देऊन स्वनिधी योजनेची सविस्तर माहिती दिली योजनेचे फॉर्म सुद्धा वाटप करण्यात आले.
समाजातील तळागाळातील गरजू फेरीवाल्यांपर्यंत लाभ पोहचविण्यासाठी बँक पुढाकार घेत असल्यामुळे फेरीवाल्यानी समाधान व्यक्त केल्याचे नवीन मुंबई झोनचे उप झोनल मॅनेजर मा. राजेंद्र बोरसे यांनी सांगितले.
बँकेचे बी.डी.ओ. प्रसेनजीत अंकुश यांनी स्वनिधी योजनेचा लाभ अधिकाधिक फेरीवाल्यांपर्यंत पोहचावा ह्यासाठी नवी मुंबई झोन प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.
बँकेच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्व स्तरावर बँकेचे कौतुक केल्या जात आहे.