सेवा व समर्पण अभियानांतर्गत भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली खारघर मंडलात विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले गेले. या अभियानात सेवा अभियान कार्यप्रमुख व खारघर मंडलाचे उपाध्यक्ष रमेश  खडकर यांच्यावतीने ५०० नाका कामगार व गरीब वस्तीतील नागरिकांना अन्नदान करण्यात आले.
यावेळी सेवा व समर्पण अभियान प्रमुख व मंडलाचे सरचिटणीस दीपक शिंदे तसेच शिवतेज मित्र मंडळाचे कमलेश मिश्रा, सुनिल गायकवाड, बबलू मेहरोलिया, सचिन केदार, प्रदीप पाटील उपस्थित होते.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.