भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष श्री विक्रांत पाटील यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा डाव उधळून लावला
पनवेल/प्रतिनिधी :
राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी स्वतः च्या मुलाला युवक कांग्रेस चे अध्यक्ष पद मिळावे यासाठी आपल्या अखत्यारीत असलेली सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला.आपल्या मुलाला युवक काँग्रेसचे अध्यक्षपद मिळावे यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली मिटींग घेण्यात आली यामध्ये कंत्राटदारांना व मीटर रिडींग घेणाऱ्या मुलांना शामिल करून घेण्यात आले होते.बैठकीला जमलेल्या सर्वांना अँप द्वारे प्रशिक्षण देण्याचे काम युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि महावितरण अधिकारी श्री डी एस धनगर यांच्या देखरेखीखाली वाशी येथील गुजरात भवनात देण्याचे योजिले होते.याविषयीची माहिती मिळलताच भारतीय जनता युवा मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील हे आपल्या युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष श्री दत्ता घंगाळे, प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रशांत कदम व अनेक कार्यकर्त्यांसह गुजरात भवन इथे पोहचले आणि या सर्व बैठकीचे चित्रण केले व महावितरण अधिकारी नोंद करीत असलेली डायरी ताब्यात घेतली.डायरी मध्ये या विषयाची इथंबूत माहिती होती.या मिटींग विषयी विचारता उपस्थित महावितरण अधिकाऱ्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना महाराष्ट्राच्या गोर-गरीब युवकांच्या पेक्षा आपल्या मुलाची भविष्याची काळजी महत्वाची आहे आणि शेतकरी व राज्यातील तमाम नागरिकांच्या भावनांशी काही एक देणेघेणे नाही हे यावरून स्पष्ट होते.सरकारी पैशांची उधळपट्टी चालते पण शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करता येत नाही.नागरीकांच्या व शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळणाऱ्या आणि आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर करणारे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने श्री विक्रांत पाटील यांनी केली.