पनवेल (प्रतिनिधी) दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर उलवे नोड येथे भारती स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी हॉस्पिटलचे फाउंडर बाबुराम वर्मा, डॉ. राहुल वर्मा, डॉ. संतोष वर्मा, भाजपचे उरण शहराध्यक्ष कौशिक शाह, उद्योजक राजेंद्र पडते, नगरसेवक राजेश ठाकूर, भाजपा अल्पसंख्यांक रायगड जिल्हा अध्यक्ष जसिम गॅस, जासई  सरपंच संतोष घरत, आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व आरोग्य सोयी सुविधांनी सुसज्ज असे, हॉस्पिटल अनमोल संकल्प अपार्टमेंट ,प्लॉट न.59 सेक्टर ५ ,उलवे ( पश्चिम )नवीं मुंबई येथे भारती  स्पेशालिटी हॉस्पिटल झाले आहे, .असे डॉ. राहुल वर्मा यांनी सांगितले .
Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.