अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखा आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मायबोली एकपात्री अभिनय राज्यस्तरीय स्पर्धेत कांदिवलीच्या कोमल वंजारे तर रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेत पनवेलच्या मुग्धा दातार यांनी बाजी मारली.
           अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  मराठी भाषेत आयोजित करण्यात आलेली हि स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये पार पडली होती. अंतिम फेरी पनवेलमधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात संपन्न झाली. अंतिम फेरीचे उद्घाटन महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते झाले. तर पारितोषिक वितरण माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध सिनेनाट्य निर्मात्या कल्पना कोठारी, अभिनेते प्रभाकर मोरे, भरत साळवे, तसेच नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष तथा महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे शहराध्यक्षा जयंत पगडे, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, नाट्य परिषद पनवेल शाखा सचिव श्यामनाथ पुंडे, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, स्पर्धा प्रमुख गणेश जगताप, अमोल खेर, चिन्मय समेळ, संजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.
            राज्यस्तरीय मायबोली एकपात्री अभिनय स्पर्धेतील प्रथम क्रमांकास १० हजार रुपये, द्वितीय ०७ हजार, तृतीय क्रमांकास ०३  हजार रुपये, उतेजनार्थ पारितोषिके तर रायगड जिल्हास्तरीय अभिनय स्पर्धेतील प्रथम क्रमांकास ०५ हजार, द्वितीय ०३ हजार तर तृतीय क्रमांकास ०२ हजार रुपये, उतेजनार्थ पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक गायत्री नाईक (वसई), तृतीय क्रमांक निकिता झेपाळे(विलेपार्ले), उतेजनार्थ क्रमांक मानसी पवार (घाटकोपर), मृणालिनी वानखेडे (ऐरोली), महेंद्र गोंडाणे(भंडारा), प्रथमेश दिग्रजकर(नागपूर), सुमित सावंत (दिवा), युवराज ताम्हणकर(डोंबिवली), रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्रतिकेश मोरे(पळस्पे), तृतीय क्रमांक कौस्तुभ सोमण(पनवेल), उत्तेजनार्थ क्रमांक श्वेता कुलकर्णी (नवीन पनवेल), उमेश वाळके (पनवेल)  यांनी पटकाविले.
Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.