विश्व निकेतन संस्थेच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे यश….

प्रतिनिधी कोकण डायरी:-

खालापूर तालुक्यातील कुंभिवली ग्रामपंचायत हद्दीतील विश्व निकेतन संस्थेचे अभियांत्रिकी महाविद्यालय हे मुंबई विद्यापीठाशी संलग्न असून महाविद्यालयामध्ये अभियांत्रिकी शाखेचे पदवीचे शिक्षण दिले जाते. या संस्थेमध्ये खालापूर, कर्जत, पनवेल, वाशी ,खारघर, लोणावळा, पुणे येथील अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणाचे प्रशिक्षण घेण्यासाठी येतात . शैक्षणिक दर्जेचे आधुनिक शिक्षण घेणे गरजेचं असल्याने चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळावी या हेतूने संस्था महत्व देते

. शिक्षण घेतलेल्या जवळपास 250 विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये मोठ्या वेतन श्रेणीतून नोकरीत निवड झाल्याबद्दल त्यांचे व संस्थेचे नावलौकिक व्हावे शैक्षणिक प्रेरणा मिळावी या हेतूने एक महत्वपूर्ण यश संस्थेच्या पदरात पडले आहे .
शेवटच्या वर्षाला विविध कंपन्यांचे प्रतिनिधी कुशल मनुष्यबळ विवेक बुद्धी मूल्यमापन अशा निवड प्रक्रियेतून अनेक विद्यार्थ्यांची चाचणी प्रत्यक्ष भेट देऊन निवड करतात .यावर्षी सुद्धा 250 विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये आकर्षक पॅकेज च्या नोकरीसाठी निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ एस बी कदम यांनी माध्यमांना दिली .विश्वनिकेतन संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. इनामदार, सचिव सुनील बांगर व प्राचार्य व्ही आर पाटील यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व प्रशिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.