उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी माझा भारत देश घडविला. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सर्व नागरिकांना शुभेच्छा देत आज पनवेल तालुक्यातील सुखापुर येथील “आशा की किरण”या व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक अध्यक्ष अल्लारखा (देवदूत) बशीर कुरेशी व सचिव सौ.नूरजहाँ कुरेशी यांच्या केंद्रात खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्यामकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत तिरंगा फडकून स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी व्यसनमुक्ती केंद्रात व्यसनापासून मुक्त होण्यासाठी दाखल झालेले व्यसनाधीन यांना अल्पोपहारचे वाटप करीत शिंदे यांनी ज्यांचे मानसिक संतुलन ठीक नाही आणि जे नशेच्या आहारी गेलेत अश्याना समुपदेशन करीत आपल्या जीवनात सकारात्मक जीवन कसे जगावे असा मौलिक सल्ला देत त्यांना उज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी “कोकण डायरी” या सुप्रसिद्ध मराठी वृत्तपत्राचे संपादक,अध्यक्ष पनवेल प्रेस क्लब तथा भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सय्यद अकबर तसेच राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे रायगड जिल्हा संघटक पत्रकार केवल महाडिक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

अल्लारखा(देवदूत) बशीर कुरेशी यांच्या मातोश्री आयशा कुरेशी यांनी दिनदुबळे गरीब जनतेच्या सेवेसाठी संपूर्ण आयुष्य वेचले “जनसेवा हीच ईश्वर सेवा”समजून लोकांची अहोरात्र सेवा केली.अश्या मातेचा आदर्श घेत आईच्या पावलावर पाऊल टाकत अल्लारखा(देवदूत) बशीर यांनी “आशा की किरण”या व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून नशेच्या आहारी गेलेल्या व्यसनाधीन लोकांची सेवा करण्याची शपथ घेतली.

त्यांचा आशा की किरण या व्यसनमुक्ती केंद्रात दारूच्या व्यसनाधीन झालेला राकेश नावाचा तरुण दीड वर्षाहून जास्त दिवस व्यसनमुक्त होण्यासाठी दाखल झाला होता.त्याला बशीर कुरेशी,सौ.नूरजहाँ कुरेशी व त्यांच्या र्केद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी मेहेनत घेत राकेश यांस व्यसनमुक्त केले. त्याच्या गरिबीमुळे व्यसनमुक्ती केंद्राचे १ लाख ७० हजार बिल माफ करत रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला बहिणीच्या स्वाधीन करून रक्षाबंधनाची अनोखी भेट दिली.या दोन्ही देवदूताचे कौतुक करावे तेवढे थोडेच.अशी बरीच उदाहरणे आहेत की जी सांगावे तेवढी थोडेच.

त्यांनी स्वातंत्र्य दिनाचेऔचित्य साधत “रक्त दान हेच सर्व स्रेष्ठ दान”मानून साई ब्लड बँक यांच्या वतीने जन आधार धर्मादायी संस्था व पनवेल ग्रामीण डॉक्टर वेल्फेअर असोसिएशन व एम.आर.फ्रेंड्स क्लब यांच्या संयुक्त विद्यामानाने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन पनवेल येथील वाजे हायस्कुल येथे केले.याप्रसंगी ३२ रक्तदात्यांनी रक्त देऊन आपला हक्क बजवला.यावेळी भगवानशेठ भगत,नितीन पाटील,नितीन भगत सर यांनी रक्तदात्यांना भेट दिली.तसेच असूडगाव रस्त्यालगत राहणाऱ्या गरीबगरजू लोकांना केंद्राच्या वतीने अन्नदानही करण्यात आले.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.