विजय केवळ कॉलोनी फोरमचा नसुन कॉलोनी फोरमवर विश्वास दाखवत लढ्यात सहभागी झालेल्या 300 सोसायटींचा….मंगेश अढाव

प्रतिनिधी पनवेल (प्रेरणा गावंड)

कामोठे कॉलोनी फोरमने आंदोलनाचा इशारा देताच कामोठे शहरातील पाणीपुरवठ्यात सुधारणा
करण्यात आली ,सिडकोची लेखी पत्राद्वारे आंदोलन मागे घेण्याची विनंती म्हणजे संघर्ष करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा विजय

मागच्या आठवड्यात कामोठे कॉलोनी फोरमच्या शिष्टमंडळाने कामोठे शहरातील पाणी समस्येबाबत सिडकोचे मुख्य अभियंता ह्यांना लेखी निवेदन देत पाणी पुरवठा सुरळीत करणेबाबत चर्चा केली होती.


कामोठे शहरात भयंकर पाणी टंचाई असुन आठवड्याभरात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास भव्य जन आंदोलनाचा इशारा कामोठे कॉलोनी फोरमच्या वतीने देण्यात आला होता.

कॉलोनी फोरमच्या इशाऱ्याची दखल घेत बैठकीच्या दुसऱ्या दिवसापासुनच कामोठे शहराला 36 दशलक्ष लिटर (MLD) पाणी पुरवठा सुरु केल्याची माहिती सिडकोच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामोठे कॉलोनी फोरमला लेखी पत्राद्वारे दिली .
तसेच कामोठे शहरातील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणी साठी पाठवले असुन त्याचा अहवाल सिडकोद्वारे देण्यात येणार असल्याचे लेखी पत्रात नमुद केले आहे.

तसेच शहरातील पाणी पुरवठ्यात सुधारणा झाली असल्यामुळे कामोठे कॉलोनी फोरमने आपले प्रस्तावित आंदोलन मागे घेऊन सिडकोला सहकार्य करण्याची विनंती सिडको प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
त्यामूळे सध्या तरी आंदोलन तात्पुरते स्थगित करत असुन सिडको प्रशासनाला सहकार्य करत आहोत. परंतू पाणी प्रश्न पुन्हा निर्माण झाल्यास कामोठे कॉलोनी फोरम जनतेच्या बाजुने पुर्ण ताकदीने लढ्यात उतरेल.

कोट
हा विजय केवळ कॉलोनी फोरमचा नसुन कॉलोनी फोरमवर विश्वास दाखवत लढ्यात सहभागी झालेल्या 300 सोसायटींचासुद्धा आहे असे मंगेश अढाव अध्यक्ष कामोठे कॉलोनी फोरम यांनी प्रसार माध्यमातून सांगितले.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.