स्पॅन महिला ऍग्रो टुरिझम प्रकल्प अध्यक्ष सुलताना बीबी चे वंशज अनिसा शेख यांच्या संस्थे कडून ९००० वृक्ष रोपण करण्यात आले.
प्रतिनिधी (साबीर शेख)
महाराष्ट्र शेतकी व पर्यटन वनीकरण वर्ष 2000 ते 2022 मध्ये एकूण वनस्पती वृक्ष संख्या ९००० वृक्ष सुलताना चांदबिबी हिल्स फणस वाडी खारघर येथे संस्थे कडून करण्यात आले.

ऍग्रो टुरिझम प्रोजेक्ट भारत सरकारच्या योजनेच्या मोहिमेचा भाग असून मेरा हरियाला देश हमारा नारा…लघुउद्योग हमे सबसे प्यारा.. अशा घोषणा देण्यात आल्या. संस्थेला 22 वर्ष पूर्ण होत असून पर्यावरण जनजागृती करून निसर्ग आयुर्वेदा बाबत कार्यक्रम राबवले जात असतात.
संस्थेची जागतिक दर्जा म्हणून नोंद असून जगभरातून ४३८ विद्यार्थी भारतीय आयुर्वेद, वनस्पतिशास्त्र व पर्यावरण ,देश संस्कृती अभ्यास व संशोधनासाठी संस्थेत येत असतात. महाराष्ट्रातून अनेक शाळकरी विद्यार्थी शेती कृषी प्रशिक्षणासाठी या संस्थेला दरवर्षी मोठ्या प्रमाणात भेट देतात.
संस्थेने अनेक संघर्षातून आपल्या मूलभूत सुविधा उभ्या केल्या असून अश्वगंधा, तुलसी, बाल ,हरडा ,मोह अशा अनेक औषधी तसेच फळे म्हणून काजू ,आंबे ,फणस सारखी अनेक वृक्ष लागवड केली आहे .
जुन्नर, मंचर ,नाशिक, औरंगाबाद, चाकण ,कोल्हापूर अशा अजून अकरा शाखेत संस्थेचे ९००० सदस्य असून ऍग्रो टुरिझम पर्यावरण शेतकी सोबत जोडणारे लघुउद्योग संस्था निर्माण करून महिला बचत गटांना विविध प्रक्रियेतून रोजगार देते .
यापूर्वीही संस्थेने स्वर्ग इंदिरा गांधी, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, देशाचे लोकप्रिय नेते शरद चंद्र पवार यांच्या नावाने सुद्धा वृक्ष रोपण केली असून ,आज सुध्दा महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम कोशियारी तसेच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, सिडकोचे एमडी संजय मुखर्जी यांच्या नावाने वृक्ष रोपण केले आले.
नवी मुंबई सारख्या आधुनिक शहरीकरण असलेल्या ठिकाणी नैसर्गिक पर्यटन महत्त्व टिकवावा म्हणून संस्था पर्यटक व प्रमोशन करण्यासाठी यावे म्हणून आव्हान करत असते.
यावेळी उपस्थित म्हणून संस्थेचे अध्यक्ष निसर्ग प्रेमी अनिसा शेख, मनिषा शेख, डॉक्टर सायरा शेख अहमदनगर ,नई रोशनी फाउंडेशन कौसर शेख, समर्पण फाउंडेशन बानू खान,निसर्ग प्रेमी श्रावणी ,सुरेखा कटकेचेरी व तसेच अन्य स्पेन महिला ऍग्रो टुरिझम प्रकल्पाचे व्यवस्थापन व निसर्ग प्रेमी पत्रकार वर्ग उपस्थित होते.
यावेळी देशातील प्रेरणादायी महानुभव संविधानिक पदावरील राजनेतिक व्यक्तिमत्त्वांच्या नावांनी वृक्षरोपण करून आकर्षक वाडी स्वरूप देणार आहेत.
संतो की वाडी सारख्या अनेक राजकीय, बुद्धिजीवी, शास्त्रज्ञ, लेखकांच्या, नावाने नैसर्गिक वारसा म्हणून वाडी बनवून ती पर्यटकांसाठी १५ ऑगस्ट स्वतंत्र दिवसाच्या महोत्सवात संस्था हे लोकार्पण करणार असल्याचे जाहिर केले .