रिपाई मातंग आघाडीच्या शिष्टमंडळाने घेतली केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांची भेट

प्रतिनिधी दि.19/ 9 (मुंबई )
प्रेरणा गावंड

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडी महाराष्ट्र राज्याचे शिस्टमंडळ भेटले

कैलासवासी हनुमंतराव साठे यांच्या मुलाला विरेन हनुमान साठे यांना लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ किंवा महात्मा फुले विकास महामंडळ याच्या चेअरमन पदी नियुक्ती करण्यात यावे व मातंग आघाडीच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात यावे तसेच मुख्य प्रवाहामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या कमिटीमध्ये महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष पदाचे ही मागणी करण्यात आली.

याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडीचे कोकण प्रदेशाध्यक्ष तुषार कांबळे, मुंबई प्रदेशाध्यक्ष नंदकुमार साठे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मनोज निवगिरे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुरज तुपे, पश्चिम महाराष्ट्र संघटक चंद्रकांत भास्कर, दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष प्रमोद ठोंबरे, पुणे जिल्हा अध्यक्ष रवी पवार, पश्चिम महाराष्ट्र सचिव योगेश जाधव, पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष अश्विन कुठे, पुणे शहर उपाध्यक्ष लखन कांबळे, पुणे संघटक राजु येल्लोरे, पुणे सहसचिव योगेश थोरात, वडगाव शेरी मतदार संघ अध्यक्ष शंकर चव्हाण, वडगाव शेरी मतदार संघ उपाध्यक्ष पंजाब मुळे आधी उपस्थित होते

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.