खोपोली येथील आत्कर गाव येथील कंपनीत अचानक आग लागली…
,प्रतिनिधी :- आत्कर गावा येथील कंपनीत आग लागली आहे. आगीने रूद्रावतार घेतल्याने फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. खोपोली येथील आत्कर गावासमोरील कंपनीत अचानक आग मोठ्या प्रमाणात असून का काही जीवित हानी झाली की नाही हे तपासण्यासाठी प्रशासनाने त्या ठिकाणी जाऊन भेट दिली . या आगीने रूद्रावतार घेतल्याने परिसरात धुराचे लोट उठले होते. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी फायर ब्रिगेडच्या पाच ते सहा गाड्या घटनास्थळी रवान्या झाल्या आहेत.
सदर कंपनी बंद असून त्यामध्ये कोणत्या प्रकारचे केमिकल आहे, याचा अंदाज येऊ शकला नाही. सध्याला केमिकलच्या ड्रमला आग लागलेली आग विझविण्याचे काम सुरू आहे. तसेच खोपोली पोलीस स्टेशनचे एपीआय हरीश काळसेकर यांच्या नेतृत्वाखाली टीम घटनास्थळी हजर झाली आहे. दरम्यान खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी यांनी या घटनेची नोंद घेतली आहे. संबंधित घटनेबाबत तपासाचे आदेश देण्यात आले.