रायगड जिल्हायातील आदिवासी समाज मोठ्याप्रमाणात असून बहुतेक आदिवासी समाज शैक्षणीकदट्या मागासलेपणा, अशिक्षीत,व असंघटीत असल्याने त्याचा गैरफायदा बिगर आदिवासी लोक घेत असल्याचे शासनाचे लक्षात आल्याने तसेच त्याना शासनाकडून दिल्या जाणा-या विविध योजनांची माहिती देण्याचे दष्टीने विजय तळेकर, तहसीलदार पनवेल यांनी प्रेरणा चारीटेबल ट्रस्ट रीस रासायनीच्या अध्यक्षा, सुशिला मेरी व संस्थेच्या केशर पाटील यांनी आदिवासी समाज बांधवांचा मेळावा आयोजीत केला होता.
सदर मेळाव्यात आदिवासी समाजाकरीता शासनाकडून दिल्या जाणा-या विविध योजनाची माहिती तहसीलदार तळेकर यांनी दिली. महसूल विभागाकडून विशेषत: दिल्या जाणा-या योजनामध्ये प्रामुख्याने रेशन कार्ड, संजयगांधी निराधार योजनेखाली पात्र व्यक्तीना देण्यात येत असलेला आर्थिक लाभ, केंद्र शासनाकडील राष्ट्रिय कुटुंब आर्थिक लाभ, आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, आदिवासी समाज अशिक्षीत असल्याने जातीचे प्रमाणपत्र देताना येणाया अडचणीबाबत विशेष मार्गदर्शन करून ज्या आदिवासी बांधवाकडे जातीचा पुराव नसेल त्याठिकाणी समाजाच्या रूढी,परंपरा याबाबत प्रत्यक्ष मंडळ अधिकारी व आदिवासी प्रकल्प निरीक्षक यांचा प्रत्यक्ष स्थळपहाणी अहवाल विचारात घेवून सदर जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी उपविभागीय अधिकारी पनवेल यांचेकडे शिफारसी करून देण्याचे आश्वासन देण्यात आले.
आदिवासी समाजाला देण्यात येणारी पिवळी रेशन कार्डबाबत आवश्यकती तात्काळ चौकशी करून देण्यात येतील, तसेच सदर रेशनकार्ड अन्नसुरक्षा योजनेतील धान्य त्वरीत मिळणेसाठी संगणकीय प्रणालीत समाविष्ट केली जातील. तसेच अन्नसुरक्षा योजना व पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतर्गत दे जाणारे मोफत धान्य आदिवासी भागात धान्य दुकानदार देत आहे किंवा कसे याबाबतही जाणून घेवून माहे नोव्हेंबर 2021 पर्यंत अन्नसुरक्षा योजना व पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतर्गत मोफत धान्य दिले जाईल यांची आठवण करून दिली.
प्रेरणा चारीटेबल ट्रस्ट रीस रासायनीच्या अध्यक्षा, सुशिला मेरी व संस्थेच्या केशर पाटील यांनी आदिवासी समाजाला देण्यात येत असलेल्या आधारकार्ड, रेशन कार्ड, जातीचे प्रमाणपत्र व उत्पन्नाचे दाखल्याबाबत ग्रामपंचायत चावणे येथे सयुक्तपणे कँम्प चेआयोजन करणेची विनंती करणेत आली. या प्रसंगी तहसीलदार यांनी मेळाव्यात प्रत्यक्ष आदिवासी बांधव व भगीनीशी त्याना शासनाचे विविध योजनाचा लाभ घेताना येणा-या अडचणीबाबत विचारणा करून त्याबाबत आदिवासी बांधवाचे शंकाचे नीरसन करणेत आले. व चावणे ग्रामपंचायतीमध्ये कँम्पचे आयोजन करणेचे आश्वासन देण्यात आले.
या मेळाव्याला नायब यहसीलदार संजय मांडे, राहुल सुर्यवंशी, एकनाथ नाईक, कांबळे व तहसील कार्यालयातील कार्मचारी उपस्थीत होते. मेळाव्याचे शेवटी प्रेरणा चारीटेबल ट्रस्ट रीस रासायनीच्या अध्यक्षा, सुशिला मेरी व संस्थेच्या केशर पाटील यांनी आदिवासी समाज बांधवांचा मेळावा आयोजीत केला होता. विजय तळेकर तहसीलदार पनवेल यांनी आदिवासी बांधवांसी प्रत्यक्ष संवाद साधून शासनाचे विविध योजनाची माहिती दिल्याने आभार मानून मेळाव्याची सांगता करण्यात आली.