रामदास कदम यांच्या विरोधात रायगड जिल्हा शिवसेनाप्रमुख शिरीष घरत यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर निषेध…

प्रतिनिधी/ साबीर शेख 

रामदास कदम यांनी केलेल्या गलिच्छ आणि अशलाघ्य वक्तव्याचा समाचार घेण्याकरीता,ज्या रामदास कदम यांना तब्बल दोन वेळा शिवसेनेने विधानपरिषद दिली आणि विधान परिषदेतून पर्यावरण मंत्री पद दिले. रामदास कदम यांच्या मुलाला आमदार केले. मासाहेब मीनाताई ठाकरे यांनी पोटच्या पोरासारखी काळजी घेतली.त्या रामदास कदम यांनी मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करणं.. ही हिम्मत दाखवणं. ही विकृती आहे हा सत्तेचा माज आहे त्याकरिता जाहीर निषेध करण्यासाठी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली,शिवसेना शाखा पनवेल या ठिकाणी रामदास कदम यांचा जाहीर निषेध करण्यात आला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत साहेब,सल्लागार शिरीष बुटाला, पनवेल उपजिल्हाप्रमुख (ग्रामीण विभाग) भरत पाटील, (शहर विभाग) उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, तालुका प्रमुख ज्ञानेश्र्वर बडे, संदीप तांडेल, विश्वास पेटकर, महानगर समन्वयक दीपक घरत, महानगर संघटक शशीकांत डोंगरे, उपमहानगर प्रमुख रामदास गोंधळी, शहप्रमुख प्रवीण जाधव, यतीन देशमुख, सदानंद शिर्के, महिला आघाडी च्या विधानसभा संघटीका सौ. रेवती सकपाळ, सौ. मीना सादरे, सौ. संचीता राणे,सौ. सानीका मोरे, रुपाली कवले, उज्वला गावडे, पदाधिकारी, युवासेना उपजिल्हाधिकारी अवचित राऊत, विधानसभा अधिकारी, पराग मोहिते तसेच उपतालुका प्रमुख,उपशहर प्रमुख विभाग प्रमूख उपविभाग प्रमुख ,शाखाप्रमुख उपशाखा प्रमूख, शिवसेना, युवासेना व युवतीसेना, महिला आघाडी पदाधिकारी व शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.