शाळेतील चालत्या बसला अचानक आग लागली…
प्रतिनिधी/ साबीर शेख
नवी मुंबईतील पिपल्स एज्युकेशन सोसायटी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सी.बी.डी बेलापूर से.१ मधील विद्यार्थ्यांना शाळेत सोडणार्या स्कूल बसला अचााक आग लागली.ही घटना सोमवारी (दि.12) नवी मुंबई खारघर येथे घडली .
शाळेच्या चालत्या बसला (एमएच 06 एस 7603) अचानक आग लागल्याने बसमधील विद्यार्थ्यांना तात्काळ खाली उतरविण्यात आले. याबाबत माहिती मिळताच खारघर अग्नीशमन दलाच्या कर्मचार्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच आगीवार निंयत्रण मिळवले.