शेतकरी कामगार पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता नामदार, लोकनेतृत्व, आमदार बाळाराम पाटील यांचे कट्टर समर्थक…
श्री. गौरव पोरवाल
प्रतिनिधी /प्रेरणा गावंड
संघटित बळ देणार ‘शक्ती आणि स्पूर्ति’ स्थान आपुलकीचा, पाठिंब्याचा नव्हे तर नैतिक आधार देणारा आपला माणूस एक सर्वसामान्य शेतकरी कामगार पक्षाचा कामोठे शहर कार्याध्यक्ष…
लोकप्रतिनिधी नसताना ही काय काय करू शकतो हे आपल्या कार्यातून सिद्ध करणारा कार्यकर्ता, आपल्या स्थानिक प्रभागासहीत शहराच्या समाज कार्यात आपल्या राजकीय पक्षाचा संस्कार म्हणून ध्येयधोरणाबाबत प्रचार, प्रसार निष्ठा म्हणून विकासासाठी प्रामाणिक संघर्ष करणारा अवलिया….
जनसामान्यांसाठी मोर्चे ,आंदोलन ,संघर्ष स्वच्छता दूतांच्या हस्ते झेंडावंदन, पारंपरिक, सांस्कृतिक उत्सव ,भगवान महावीर जन्मोत्सव, सार्वजनिक गणेश उत्सव, नवरात्र उत्सव ,हरितालिका उत्सव, महिला सक्षमीकरणासाठी कार्यक्रम अश्या अनेक समाज हितात कार्य ते वर्ष भर करत असतात.
आपल्या कामोठे प्रभागातील आपल्या लोकांच्या प्रत्येकाच्या सुखदुखात निस्वार्थी भावने तन, मन व धनाने धावून जाणारा आपला माणूस ….
सर्वसामान्य लोकांच्या मूलभूत हक्कांसाठी अनेक अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणारा शेतकरी कामगार पक्षाचा क्षत्रिय लढवय्या नेता ….
सर्वसामान्यांच्या जीवनातील आपत्कालीन परिस्थितीत मित्रपरिवारांच्या संकट समयी त्यांच्या पाठीशी आधार देणारा माणूस …. संघर्षात निडरपणे उभे राहाणारा , शांत , संयमी , दिलखूलास , अभ्यासू , हजरजबाबी , हसतमुख व दिलदार व्यक्तिमत्व समजले जाणारा, शैक्षणिक , धार्मिक , क्रिडा सामाजिक व राजकीय क्षेत्रात अहोरात्र सक्रिय असणारा, अनेक युवा तरुणांचे प्रेरणास्थान ,राहणीमान रुबाबदार पण..बोलण्यत नम्रता ठेवत लहानमोठ्यांचा आदर करणारे, केवळ शहरातील नागरीकांचे नाही तर तालुक्यांतील नागरिकांच्या समस्या सोडविणारे,
विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत मैत्रीपूर्ण संबध बाळगणारे, जातिधर्माच्या पलीकडे जावून अडचणीत असलेल्या त्या प्रत्येकाच्या संकटात मदत करणारे व्यक्ति विशेष गौरव पोरवाल यांच्याकडे लोक आगामी निवडणुकीत आमचा नगरसेवक म्हणून अपेक्षेने पाहत आहे.
येणाऱ्या निवडणुकीत दादा आप हमारे लोकप्रतिनिधी हो.. आप मे व योग्यता और लोकनेतृत्व करने का संस्कार हे असे म्हणत त्यांच्या कडे आपली इच्छा व्यक्त करतात.
विश्वासार्हतेचे हे सामाजिक बंधन असेच राहो,तुमच्या आयुष्यात जन संघर्षातून, जनकल्याण करणारा सागर वाहत राहो,प्रार्थना आहे देवापाशी की,तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो.
तुम्हाला लेखणी च्या माध्यमातून बेधडक च्या व्यासपीठावरून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! व पक्षाचा निष्ठावंत म्हणून लाल सलाम.