एक हाक प्रवाशांच्या सोयीसाठी..
अभिजित पांडुरंग पाटील,
कार्याध्यक्ष, पनवेल प्रवासी संघ.
प्रतिनिधी पनवेल
पनवेल प्रवासी संघाच्या वतीने धरणे आंदोलन करून प्रवाशांच्या हक्कासाठी संघर्ष करण्यासाठी मोठ्या संख्येने सामील व्हा असे आव्हान करण्यात येत आहे.
प्रवासी नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या उदात्त हेतूने हा एक लोकआंदोलन आहे.
गेली 14 वर्षे लाल फितीच्या कारभारात अडकून पडलेल्या पनवेल एसटी स्थानकाच्या प्रकल्प उभारणी करता पनवेल प्रवासी संघाच्या माध्यमातून एल्गार पुकारले जात आहे.
राज्य परिवहन मंडळाच्या पनवेल स्थानकातून प्रवास करणे म्हणजे एक जिगरीचे काम आहे. येथील कर्मचारी वर्ग देखील जीव मुठीत घेऊन मोडकळीस आलेल्या इमारतीत काम करत आहे. कोकण आणि मुंबई विभागांना जोडणारे अत्यंत महत्त्वाचे स्थानक जर दुर्लक्षित असेल तर बाकी स्थानकांच्या बाबतीत विचार करणे देखील दुरापास्त होईल.
बांधा व हस्तांतरित करा या धर्तीवरती महाराष्ट्रात पाच स्थानके प्रायोगिक तत्त्वावर विकसित करण्यासाठी निवडले गेले आहेत. त्यामध्ये पनवेल स्थानकाचा समावेश झालेला आहे. दुर्दैवाने त्यानंतर मात्र काम तसूभर देखील पुढे सरकलेले नाही. सदरचे काम मार्गी लागण्यासाठी पनवेल प्रवासी संघाच्या माध्यमातून 3 नोव्हेंबर 2022 रोजी लाक्षणिक उपोषणाचे संविधानिक हत्यार उपसले आहे.
अनेक सेवाभावी संस्था या आंदोलनामध्ये पनवेल प्रवासी संघाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार आहेत, आपापले राजकीय सिद्धांत आणि अभिनिवेश दूर बहुतांश राजकीय पक्षांचे नेते मंडळी त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. या आपल्या जन आंदोलनात मोठ्या संख्येने आपल्या हक्कासाठी आपले कर्तव्य म्हणून उपस्थित रहावे असे आव्हान अभिजित पांडुरंग पाटील,
कार्याध्यक्ष, पनवेल प्रवासी संघ. च्या वतीने करण्यात आली .
तारीख : गुरुवार 03 नोव्हेंबर 2022
ठिकाण : पनवेल बस डेपो
वेळ : सकाळी १०:००
स्थळ पनवेल बस डेपो