सामान्यतील असामान्य व्यक्तिमत्व माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक रामदास शेंडे यांच अभिष्टचिंतन सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थित साजरा…

प्रतिनिधी खोपोली ( साबीर शेख)

खोपोली शहरात अनेक वर्षापासून समाजसेवेतून आपला लोक सेवेचा  वारसा पुढे नेणारे वारकरी परंपरा लाभलेले एक कुटुंब म्हणजे  माजी नगराध्यक्ष रामदास कोंडीराम शेंडे

राजकीय जीवनात कधीही कुठल्याही व्यक्तिगत विषयी  गटतट ,वादविवाद, संघर्ष न करता आपल्या कार्यातून लोक नेतृत्व सिद्ध करणारे ,आपुलकीचा, पाठिंब्याचा नव्हे तर नैतिक आधार बळ देणारे ‘शक्ती आणि स्पूर्ति’ म्हणजे रामदास शेंडे यांचे ज्येष्ठ पुत्र माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक रामदास शेंडे (भाऊ ) कुलदीपक शेंडे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोली शहरातीलच नव्हे तर रायगड जिल्ह्यातील अनेक नामवंत शैक्षणिक ,सामाजिक, राजकीय,पत्रकार क्षेत्रातील अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या .

 

कुलदीपक शेंडे यांच्या आज पर्यंत च्या यशस्वी राजकीय इच्छाशक्ती कडे पाहता  अनेकांनी त्यांना येणाऱ्या खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून सहकार्य करण्याची  इच्छा ही व्यक्त केली.

खोपोली नगर शेंडे कुटुंबीयांच्या अनेक केलेल्या कार्यातून इतिहासात नोंद ठेवत असतो व आपला लोकसेवेचा वारसा आजही कायम असल्याचे समाधान अनेक जण त्यांच्या  राजकीय ,प्रभावी  अस्तिवामुळे अनुभवतात.   भविष्यात ही खोपोली नगरपरिषद, विधानसभा, लोकसभा सारख्या निवडणूक प्रक्रियेत शेंडे कुटुंबीयांच्या सामाजिक ,अध्यात्मिक, शैक्षणिक, राजकीय प्रभावामुळे अनेकांचे लक्ष  वेधते त्यामुळे शेंडी कुटुंबीयांच्या समर्थात अनेक मोठा  जनसमूह त्यांच्या  पाठीशी उभे राहताना आज पर्यंत  दिसतो .

खोपोली नगरपरिषद माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांच्या कालच्या अभिष्टचिंतन सोहळा नंतर त्यांच्या पाठीशी असणारा मोठा जनसमूह पाहता राजकीय वर्तुळात नगराध्यक्ष पदाच्या श्रेणीत कुलदीपक शेंडे यांना पाहण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली.

नगराध्यक्षपदी आपल्या सारखा अभ्यासू  युवा तरुण शहराचा सर्वांगीण विकास ,अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून शहराला प्रगती कडे नेण्याची इच्छाशक्ती ठेवत असेल तर त्यासाठी  आम्ही  आपल्या पाठीशी आहोत अशा सदिच्छा, शुभेच्छा त्यांना कुलदीपक भाऊ तुम्ही दिपिका सारखे समाजाला प्रकाशमय देणारे व्हावे अश्या शब्दातुन शुभेच्छा दिल्या

अनेकांच्या  सुखदुःखात तत्परतेने धावुन जाण्याची कुलदीपक  भाऊ ची  तळमळ सर्वांच्या मनाला भावणार  त्यांचं  व्यक्ती मत्व ,त्यांची समाजमनाशी जुळलेली नाळ अधिक दृढ व्हावी, उदयोन्मुख समाजाचे प्रतिनिधित्व करताना यशस्वी राजकीय वाटचाल सदैव अशीच अग्रेसर राहो, हीच लेखणीच्या माध्यमातून त्यांना  सदिच्छा!

अभिष्टचिंतन सोहळा प्रसंगी येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचे, पाहुण्यांचे केतन रामदास शेंडे व  मित्रपरिवाराच्यावतीने मानसन्मान सत्कार करून मनापासून आभार व्यक्त करण्यात आले.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.