तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन (TIA) आणि उद्योग, सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय (DISH) तर्फे
नीअर मिस रिपोर्टिंग द्वारे अपघात प्रतिबंधक प्रशिक्षण

प्रतिनिधी/तळोजा(साबीर शेख)

16 फेब्रुवारी 2023 रोजी तळोजा एमआयडीसीतील उद्योगांनी नीअर मिस रिपोर्टिंग द्वारे अपघात प्रतिबंधक प्रशिक्षण या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
सुरक्षा व अपघात प्रतिबंधाबद्दल मार्गदर्शन व अधिकृत माहिती, अधिकार देत उपस्थितांना प्रशिक्षण देण्यात आले.
कार्यक्रमास उद्योग, सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय तज्ञ अधिकारी म्हणून अंकुश खराडे – उपसंचालक , केशव केंद्रे-उपसंचालक ,अजित मोहिते-उपसंचालक व तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन शिष्टमंडळ सतीश शेट्टी अध्यक्ष , बिनीत सालियन – मानद सचिव , भावेश मोदी-समिती सदस्य , बिदुर भट्टाचार्जी-सेक्रेटरी जनरल, सुनील पाधीहारी-कार्यकारी सचिव
कार्यक्रमात आयोजक म्हणून उपस्थित होते.


सविस्तर कार्यक्रम माहिती सादरीकरण तंत्रज्ञान म्हणून अंकुश खराडे, केशव केंद्रे , अजित मोहिते यांनी काम पाहिले.
प्रशिक्षण कार्यक्रमाच्या शेवटी, प्रेक्षकांना अपघाताची मूलभूत तत्त्वे ,क्लोज-कॉल किंवा जवळचे अपघात सुनिश्चित करून संभाव्य घटनांना प्रतिबंध व त्याची पुनरावृत्ती रोखणाऱ्या जलद कृती सुलभ करण्यासाठी सक्रियपणे अहवाल दिला .


तळोजा एमआयडीसीचे अल्केम, शेरॉन बायो फार्मा, आयजीपीएल, एलएसआर ऑइल, नंदन पेट्रोकेम, स्मिथर्स ओएसिस, एस्के डायस्टफ, संघी संस्था, टेक्नोव्हा, एसकेएम मेटल प्रोसेसर, केएसएच इंटरनॅशनल, क्वेस्ट परफॉर्मन्स, फियाबिला, वाल्व्ह टेक, रवी डायस्टफ, व्हिस्टा प्रोसेस्ड फूड्स, चोक्सी केमिकल्स, बन्सल आयर्न प्रोसेसर्स, दीपक फर्टिलायझर्स, ओवेन्स कॉर्निंग, तळोजा स्टील सर्व्हिस सेंटर लिमिटेड, इंदू कॉर्पोरेशन, लासन इंडिया,मॉडीकेम फार्मा आदींनी उद्योग समूहाने बैठकीत सहभाग घेतला.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.