सराईत आरोपी खारघर परिसरात मोबाईल चोरी करताना सापडला …
चोरीतील गुन्हेगार गजाआड…

पनवेल, दि.21
सराईत गुन्हेगारास मोबाईल चोरीच्या आरोपात खारघर पोलिसांनी ताब्यात घेतले असून खारघर पोलिसांच्या कार्या बद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे. आरोपी च्या अटकेमुळे मोबाईल चोरीसह चेन स्नॅचिंगचे अनेक गुन्हे उघडकीस आले असल्याची माहिती सूत्रानुसार कळते.

खारघर येथे रहवासी विनोद शंकरराव चाटे , सकाळी 0 9 :00च्या सुमारास खारघर , सेक्टर 27 , रांजणपाडा ते गुरूद्वारा रोडवर जात असताना आरोपी काशिम मुक्तार दराणी उर्फ छोटा कासीम उर्फ तलब (22 रा.आंबिवली) याने त्याच्याबरोबर असलेल्या इसमांशी संगनमत करुन काळया रंगाच्या पल्सर मोटार सायकलवरून पाठीमागुन येवुन फिर्यादीचे हातातील 60,000 / – रु किंमतीचा मोबाईल जबरीने हिसकावून चोरून पळुन गेल्याचा प्रकार घडला .संबंधित तक्रार खारघर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आली आहे . नमुद गुन्हयांचे अनुषंगाने अशा प्रकारे मोबाईलची जबरी चोरी करणार्‍या सराईत आरोपीचा शोध घेत असताना मिळालेल्या माहितीनुसार ठाणे कारागृहात अटकेत असलेला आरोपी नामे काशिम मुक्तार दराणी उर्फ छोटा कासीम उर्फ तलब वय 22 वर्षे रा . रूम नंबर 04 पाटीलनगर , गणेश चाळ , अंबिवली ता . कल्याण याचा ताबा घेवुन कौशल्यपुर्वक तपास केला असता नमुद गुन्हयातील मोबाईल चोरी आरोपीने केल्याबाबत माहिती दिल्याने त्यास अटक करण्यात आली असुन त्यांचेकडुन फिर्यादीचा चोरी केलेला 60,000 / – रू किंमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह, पोलीस सह आयुक्त डॉ जय जाधव, शिवराज पाटील, परीमंडळ 2, पनवेल , सहा.पोलीस आयुक्त, भागवत सोनावणे, पनवेल विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि. संदीपान शिंदे, सपोनि मानसिंग पाटील, पोहवा बाबाजी थोरात, पोना प्रशांत जाधव, धनवटे, पोशि शिंगाडे, पोहवा वैद्य यांनी सदरची कामगीरी केली आहे.
खारघर च्या नागरिकांनी आपल्या शहरातील सुरक्षा व्यवस्था योग्य असल्याचे समाधान वाटते आणि त्यासाठी आम्ही सुद्धा सतर्क राहू म्हणून सामाजिक संस्था ,मंडळाच्या जनजागृती तुन अश्या अडचणी वर मात करू म्हणून सहकार्य दर्शवले आहे .

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.