सलमान खानकडून पनवेलमधील शेजाऱ्याविरुद्ध तक्रार .

सिटी सिव्हील कोर्टात खटला दाखल

पनवेल : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते नेहमी उत्सुक असतात. सलमान अनेक वेळा सण तसेच विविध कार्यक्रम साजरे करण्यासाठी त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसमध्ये कुटुंबासोबत जात असतो. या फार्महाऊसमधील फोटो सलमान सोशल मीडियावर शेअर करतो.  लॉकडाऊनमध्ये देखील सलमान त्याच्या या पनवेल येथील घरामध्ये राहात होता.  पनवेलमधल्या सलमानच्या फार्म हाऊसजवळच्या भूखंडाचा मालक असलेल्या केतन कक्कर विरूद्ध सलमान ने सिटी सिव्हील कोर्टात खटला दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण 
सलमान खाननं त्याच्या शेजाऱ्याविरोधात म्हणजेच केतन कक्कड विरोधात मानहानीचा दावा दाखल केलाय. सोशल मीडियावर सलमान खानचे फोटो पोस्ट केल्यामुळे त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना त्रास झाला. यावर बंदी घातली पाहिजे, असं या तक्रारीमध्ये म्हटलंय. केतन कक्कड यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी कोर्टाला रिप्लाय फाईल करण्यासाठी वेळ मागितला आहे. केतन कक्कर यांनी यूट्यूब चॅनेलवरून सलमानबाबत अपमानास्पद शब्दांचा वापर केला. हा दावा दाखल झाल्यानंतर न्यायालयानं कक्कर यांना उत्तर देण्यास सांगितलं आहे. या प्रकरणात पुढची सुनावणी २१ जानेवारीला होणार आहे.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.