पनवेलमध्ये अ‍ॅडव्हान्स ट्रॉमा केअर सेंटर तसेच प्रसूती व बालसंगोपन केंद्र उभारावे; आमदार प्रशांत ठाकूर यांची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

पनवेल(प्रतिनिधी) 

पनवेलमध्ये शंभर बेडचे अ‍ॅडव्हान्स ट्रॉमा केअर सेंटर आणि महापालिका क्षेत्रात प्रसूती व बालसंगोपन केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्याकडे केली. 

           केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी रविवारी पनवेल येथील खांदा कॉलनीमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ ट्रेनिंग अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरला भेट देऊन आढावा घेेतला. भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी मंत्रीमहोदयांचे स्वागत केले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलमध्ये शंभर बेडचे अ‍ॅडव्हान्स ट्रॉमा केअर सेंटर आणि महापालिका क्षेत्रात प्रसूती व बालसंगोपन केंद्र उभारण्यात यावे या मागण्यांचे निवेदन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांना दिले. या दौर्‍यात केंद्रीय आर्थिक सल्लागार निलम्बुज शरण, राष्ट्रीय जन स्वास्थ्य प्रशिक्षण व अनुसंधान संस्थानचे संचालक डॉ. सुनील गीत्ते, सहसंचालक डॉ. सुधीर वांजे, सीएमओ (एसएजी), डॉ. सुपर्णा खेरा,  संचालक प्राध्यापक डॉ. दीपक राऊत, सीनियर मेडिकल ऑफिसर डॉ. अमोल आडे आदी सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे भाजप खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.