गुरुवारी पनवेलमध्ये ‘मेरी आवाज हि पहचान है’ सुमधुर गाण्यांचा कार्यक्रम
 

पनवेल(प्रतिनिधी)  :- भारतरत्न लता मंगेशकर यांच्या सुरेल आणि सोनेरी आठवणींना उजाळा देण्यासाठी पनवेलमध्ये गुरुवार दिनांक २४ फेब्रुवारी रोजी रात्री ०८ वाजता शहरातील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ‘मेरी आवाज हि पहचान है’ या सुमधुर गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा, भारत विकास परिषद, रंगनिल संस्था, रंगरचना कलामंच, संस्कार भारती पनवेल समिती आणि पनवेल कल्चरल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सामगंध कलाकेंद्र पनवेल हे सादरकर्ते आहेत. या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी मोफत प्रवेशिका अमोल स्टेशनरी, टिळक रॉड पनवेल (संपर्क क्रमांक ९८२०२३३३४९) येथे उपलब्ध करण्यात आले आहे. 
Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.