ठाण्यातील “वडा पाव चा राजा” ठरला अक्काचा वडापाव

अभिनेता भाऊ कदमच्या उपस्थितीत महाराष्ट्राच्या ७ शहरांमधील प्रसिद्ध वडा पावची घोषणा

ग्राहकांच्या पसंतीच्या मतदानाच्या आधारे झाली निवड

अभिनेता भाऊ कदमच्या उपस्थितीत महाराष्ट्राच्या ७ शहरांमधील प्रसिद्ध वडा पावची घोषणा

ठाणे, २६ मे २०२२: वडापाव हा महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतिनिधित्व करतो आणि तो राज्यभरातील लोकांसाठीचा लाडका आणि आरामदायी खाद्यपदार्थ आहे. महाराष्ट्र पर्यटन महामंडळ च्या सहकार्याने आणि गोदरेज खाद्यतेल तर्फे लोकांच्या पसंतीक्रमावर आधारित महाराष्ट्राच्या ७ शहरांमधील आघाडीच्या सर्वोत्तम वडा पाव आउटलेट्सची ओळख करून देण्यासाठी एक अनोखा पथदर्शी उपक्रम सादर केला आहे. .

प्रसिद्ध चित्रपट अभिनेते भाऊ कदम यांच्या उपस्थितीत ठाणे येथे आयोजित एका समारंभात वडापाव आऊटलेट मालकांना औपचारिकरित्या सन्मानित करण्यात आले. दोन राष्ट्रीय पुरस्कार विजेते शेफ वरुण इनामदार; खाद्य लेखक आणि अभिनेते कुणाल विजयकर; महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयातील पर्यटन विशेषज्ञ प्रीती वानगे पवार आणि गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी संचालक आणि अध्यक्ष नितीन नाबर हेही यावेळी उपस्थित होते.

‘वडा पाव चा राजा’ हा उपक्रम मुंबई, ठाणे, औरंगाबाद, पुणे, नवी मुंबई, नाशिक आणि सातारा येथे पार पडला. या शहरांमधील जवळपास २५० इच्छुक आउटलेट्सवर मतदानासाठी क्यूआर कोड ठेवण्यात आले होते. चव आणि समाधानाच्या आधारावर ग्राहकांनी प्रत्येक आउटलेटवर मतदान केले. या मोहिमेला जनतेचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

मुंबईस्थित वडा पाव आऊटलेट अंधेरी येथील साई कृपा वडा पाव यांना त्यांच्या ग्राहकांकडून मिळालेल्या मतांच्या आधारे ‘वडा पाव चा राजा’ म्हणून घोषित करण्यात आले. उपविजेता ठरला ठाण्याचा अक्काचा वडा पाव. अग्रस्थानी असलेल्या या दोन विजेत्यांव्यतिरिक्त सात शहरांमधील २० आउटलेट्सना संबंधित शहरांमध्ये ग्राहकांची सर्वाधिक पसंती मिळविल्याबद्दल विशेष सम्मानाने गौरविण्यात आले.

गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी संचालक आणि अध्यक्ष नितीन नाबर म्हणाले, “मी सर्व विजेत्यांचे ग्राहकांनी त्यांच्यावर केलेल्या प्रेमाच्या वर्षावाबद्दल अभिनंदन करू इच्छितो. गोदरेज व्हेज ऑइल हे चव, शुद्धता, गुणवत्ता आणि खाद्यतेलांच्या विविधांगी श्रेणीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ओळखले जाते. वडा पाव आस्थापनांना शुद्ध, भेसळविरहित आणि दर्जेदार ब्रँडेड तेल वापरण्यास प्रोत्साहित करणे हे या मोहिमेचे व्यापक उद्दिष्ट आहे जेणेकरून लोकांना केवळ उत्तम चवच नाही तर उत्तम दर्जाचे खाद्यपदार्थही मिळतील.”

लोकप्रिय चित्रपट अभिनेते भाऊ कदम म्हणाले, “गोदरेज व्हेज ऑइलचे प्रतिनिधित्व करणे खूप आनंददायी आहे आणि राज्यभरातील वडा पाव मालकांना भेटून खूप मजा आली. सूर्यफूल तेल, राइस ब्रॅन ऑइल, फिल्टर केलेले शेंगदाणा तेल, रिफाइंड शेंगदाणा तेल आणि रिफाइंड सोयाबीन तेल यांसारख्या गोदरेज व्हेज ऑइल सादर करत असलेल्या खाद्यतेलांची विविधांगी वैशिष्ट्यपूर्ण श्रेणी पाहून मला आश्चर्य वाटले. सर्वसामान्य माणसाइतकेच सेलिब्रिटींचेही वडा पाव वर तेवढेच प्रेम असते. त्यांनाही तो तितकाच आवडतो. वडापावबद्दल आपल्या राज्याला वाटत असलेल्या प्रेमाविषयी बोलण्याबरोबरच हा उपक्रम सर्व वडा पाव आउटलेट मालकांना त्यांनी महाराष्ट्रातील लोकांसाठी स्वयंपाक करताना दररोज उच्च दर्जाचे शाकाहारी तेल वापरावे याची आठवण करून देणारा होता.”

याप्रसंगी बोलताना पर्यटन संचालनालय (महाराष्ट्र)चे संचालक मिलिंद बोरीकर म्हणाले, “गोदरेज व्हेज ऑइलने आयोजित केलेल्या ‘वडा पाव चा राजा’ उपक्रमाशी जोडून घेतल्याचा महाराष्ट्र टुरिझमला आनंद होत आहे. वडा पाव हा महाराष्ट्रातील विशेषत: मुंबईतील सर्वाधिक लोकप्रिय खाद्यपदार्थांपैकी, तोंडाला पाणी सुटणारा एक पदार्थ आहे. महाराष्ट्रातील असंख्य फूड आऊटलेट्सवर उपलब्ध असलेल्या वडापावचा आस्वाद घेतल्याशिवाय महाराष्ट्रातील पर्यटन अनुभव अपूर्ण आहे. हा ‘वडा पाव चा राजा’ उपक्रम अधिकाधिक वडा पाव उत्पादकांना पुढे येण्यास आणि राज्यातील पाककृतीचा एक अंगभूत भाग बनलेल्या या स्वादिष्ट खाद्यपदार्थाचा आस्वाद घेण्याचा आनंद साजरा करायला प्रोत्साहित करेल.”

या उपक्रमाचा एक भाग म्हणून गोदरेज व्हेज ऑइल विविध समुदायांना विशेषकरून ‘वडा पाव चा राजा’ साई कृपा वडा पावने बनवलेले एकूण ५००१ वडापाव वितरित करेल. हे वडा पाव मुंबईतील डबेवाला समाज यांना आणि रॉबिन हूड आर्मी या शून्य-निधी संस्थेला गरजूंमध्ये वाटण्यासाठी देण्यात येतील

यावर भाष्य करताना मुंबई डबावालाचे प्रवक्ते रितेश आंद्रे म्हणाले, “आम्ही डबेवाले नेहमीच लोकांना वेळेवर जेवण मिळावे याची दक्षता घेत असतो. पण डबेवाल्यांची काळजी घेणारा आणि आम्ही भुकेले राहत नाही ना याची दक्षता घेत असलेला उपक्रम बघणे ही खूप छान गोष्ट आहे. ‘वडा पाव चा राजा’ चा मुकुट मिळविण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही या उपक्रमाचे कौतुक करतो. हा उपक्रम केवळ आपल्या प्रादेशिक खाद्यपदार्थाचे कौतुक करतो असे नाही तर समुदायाशी थेट संपर्क देखील प्रस्थापित करतो.”

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.