अखिल भारतीय बुद्दिष्ट प्रतिष्ठान यांच्या वतीने तथागत गौतमबुद्ध यांच्या जयंती निमित्त बुध्दपौर्णिमा साजरी
प्रतिनिधी पनवेल
बुद्धम शरणं गच्छामि!*
भारत देशाल ज्ञानाची,संस्कारांची,युगानुयुगे मार्गदर्शन करणाऱ्या विचारसरणीची अतिशय समृद्ध परंपरा लाभलेली आहे. भारतीय दर्शनशास्त्रापैकी एक शास्त्र बौद्ध दर्शन होय. राजपूत्र म्हणून जन्माला आलेले आणि गयेला बोदीवृक्षाखाली परमशांतीचा अनुभव घेतलेले गौत्तम बुद्ध हे या दर्शनशास्त्राचे प्रणेते आहेत.
वैशाख पौर्णिमेचा(बुद्धपौर्णिमा) दिवस भारतातच नव्हे तर इतरही अनेक देशात उत्साहने साजरा केला जातो.त्याच आनंदाच्या उत्साहात रायगड पनवेल येथील अखिल भारतीय बुद्दिष्ट प्रतिष्ठान यांच्या वतीने तथागत गौतमबुद्ध यांच्या जयंती निमित्त बुध्दपौर्णिमा साजरी करण्यात आली.यावेळी अध्यक्ष संतोष कीर्तिकर,कोकण म्हाडाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील,भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड प्रभारी कोकण डायरीचे संपादक पत्रकार सय्यद अकबर आदी मान्यवर कार्येकर्ते उपस्थित होते.