भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पनवेल तालुका व शहर भाजपच्यावतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, नगरपालिकेचे माजी आरोग्य सभापती उमेश मानकामे(पोद्दार), कामगारनेते जितेंद्र घरत, कार्यालयीन सचिव रमेश देशमुख, यांच्यासह कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.