रसायनीतील एनआयएसएम सेबीमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा

प्रतिनिधी/(प्रेरणा गावंड)

रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील असलेल्या मोहोपाडा येथील भारतीय अर्थव्यवस्थेचे प्रशिक्षण देणारी केंद्र सरकारची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट एनआयएसएम सेबी येथे ७५ व्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी महाराष्ट्र सुरक्षा बळाचे नौजवानांनी विविधप्रकारे परेड करून भारतीय सैनिकांच्या आठवणी जाग्या केल्या.

एनआयएसएमचे डायरेक्टर डॉ. सि. के. जी. नायर यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला सलामी देत भारतमातेचे राष्ट्रगीत गायले. तर इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांनी जय जवान जय किसान, वंदे मातरम् आदी देशभक्ती गीत गावून भारत माता की जय घोषणाबाजी केली.

दरम्यान भारतीय अर्थव्यवस्थेचे प्रशिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याने १७विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.यानंतर इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांची दोरीखेच स्पर्धा पार पडली.

यावेळी एनआयएसएम सेबीचे डायरेक्टर डॉ. सिकेजी नायर , रजिस्ट्रार अधिकारी सुनील कदम, लेफ्टनंट कर्नल तथा जनरल मॅनेजर रमेश कुमार आदींसह मान्यवरांसह एनआयएसएम स्टाफ, विद्यार्थी , गार्ड कुटूंबिय उपस्थित होते.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.