शिरीष पवार,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
खोपोली पोलीस स्टेशन तर्फे  समस्थ खोपोली च्या जनतेस आवाहन

विशेष जनजागृती व सतर्कता आवाहन खोपोली वृत्त:-

दिवाळी सणानिमित्त आज २० ऑक्टोंबर पासून  पुढील दोन-तीन दिवस खोपोली बाजारपेठेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदीसाठी गर्दी करत आहेत. रिक्षा व चारचाकी वाहने बाजारपेठेमध्ये आणल्यामुळे वाहतूक जाम होण्याची समस्या निर्माण होत आहे. तसेच गर्दीचा व वाहतुक जाम होण्याचा गैरफायदा घेऊन काही भुरटे चोर चोरी करण्याची देखील शक्यता आहे. याकरिता सतर्कता व जनजागृती व्हावी म्हणून गुन्हेगारांपासून चोरीचे कोणतेही प्रकार होऊ नये तसेच सर्व नागरिकांना व्यवस्थितपणे सुरक्षित बाजारपेठेमध्ये फिरता यावं या उद्देशाने दीपक चौक ते खालची खोपोली कमान या परिसरातील तीन चाकी व चार चाकी वाहनांची वाहतूक गर्दीच्या वेळी काही कालावधीसाठी बंद करण्यात येत आहे. सदर वाहनांच्या बंदी करिता सर्व नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे ही विनंती.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.