देशातील सर्वात मोठ्या आणि मुस्लिमबहुल राज्यात २७४ जागावर भाजपचा विजय कॉंग्रेस क्षीण झाल्याचे निदर्शक – हाजी एजाज देशमुख

कोल्हापूर –

गेल्या सत्तर वर्षात कांग्रेस पक्षाने मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध मतदाराना गृहीत धरुन राजकारण करत सत्तेची फळे चाखली. गरीबी हटाव चा केवळ नारा देत गरीबानाच हटाव हा अजेंडा राबवला. याऊलट भाजपने सबका साथ ,,सबका विकास ही भूमिका घेतली. म्हणूनच सलग दुसऱ्या वेळी देशातील सर्वात मोठे राज्य असणाऱ्या उत्तर प्रदेश मध्ये मुस्लिम मतदार संख्येने जास्त असूनही भाजपाला २७४ जागी विजय मिळवता आला. देशामधून काँग्रेस संपली असल्याचे यातून स्पष्ट दिसते असे प्रतिपादन भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष हाजी एजाज देशमुख यानी कोल्हापुरात बोलताना केले. भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. हॉटेल जोतिबा येथे झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे हे होते. अल्पसंख्यांक मोर्चाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा .तबस्सुम बैरागदार, अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आकाशा मुल्ला, भाजपचे जिल्हा सरचिटणीस विजय जाधव, राजरामपुरी मंडल अध्यक्ष रवींद्र मुतगी, मंडल चिटणीस दिलीप मैत्राणी, यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली.

यावेळी बोलताना एजाज देशमुख यानी राज्यातल्या महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील सरकार असताना अल्पसंख्यांक समुदायातील अनेक नेत्यांना विविध महामंडळ आणि सरकारी समित्यावर काम करण्याची संधी मिळाली. परन्तु महाविकास आघाडी सरकारच्या काळात पाच महामंडळ अद्याप रिक्त का असा सवाल त्यानी केला. भाजपा सरकार मुस्लिम आणि अल्पसंख्यांक विरोधी असल्याचा कुप्रचार केला जातो. पण नरेंद्र मोदी यानी मुद्रा लोन सारख्या योजनांचा थेट लाभ देऊन अल्पसंख्यांक समाजाला दिलासा दिल्याने भाजपच्या मतांचा टक्का वाढत असल्याचे त्यानी स्पष्ट केले. मुस्लिम आणि इतर अल्पसंख्यांक वर्गातील नागरिकांनी केंद्रीय २६४ पेक्षा अधिक कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन देशमुख यानी केले.यावेळी तबस्सुम बैरागदार, राहुल चिकोडे, रवींद्र मुतगी , दिलीप मैत्राणी, यानी आपले मनोगत व्यक्त केले.१७ पेक्षा अधिक वेळ हज यात्रा केल्याबददल हाजी एजाज देशमुख यांचा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आजम जमादार यांच्या हस्ते पुस्तक ,राजर्षि दिनदर्शिका आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. अल्पसंख्याक मोर्चाचे सरचिटणीस शाहरुख गडवाले यानी सूत्रसंचालन केले,तर प्रभाकर हिंदोड़े यानी आभार मानले. या बैठकीचे संयोजन आजम जमादार,महालक्ष्मी सखी मंचच्या अध्यक्षा सौ जस्मिन जमादार, सौ सुषमा गर्दे, झांकिर जमादार, शाहरुख गडवाले,फैयाज अथणीकर, उदय जाधव, अय्यान जमादार ,सादिक जमादार, आयाज शेख, उमेश जाधव, सागर केंगाने, नाजीम अत्तार, अभिषेक पाटील, आदींनी केले.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.