महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेनेच्या जिल्हा उपाध्यक्ष-रायगड’ या पदावर इम्तियाज शेख यांची नियुक्ती
प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यातील राजकीय नेतृत्व करताना इम्तियाज शेख यांनी राजकीय ,सामाजिक, शैक्षणिक, कामगार क्षेत्रात अनेक कार्य केले. त्याची दखल घेऊन महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेने अध्यक्ष निलेश भोसले यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे तसेच शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेनेच्या जिल्हा उपाध्यक्ष- कर्जत खोपोली
विधानसभा, रायगड’ या पदावर इम्तियाज शेख यांची नियुक्ती केली.
पक्ष संघटनात्मक ध्येय, धोरणे आणि माथाडी कामगार संघर्ष व
संघटनेच्या माथाडी कामगारांना न्याय मिळावा सर्व सरकारी कामगार योजना मिळाव्या म्हणून त्यांच्या कडून पक्ष अपेक्षा करेल .
माथाडी कामगारांना निर्भीड, कृतीशील आणि अभ्यासू नेतृत्वाची कामगार वर्गाला अभिप्रेत असलेलं कार्य असावं असे पक्ष श्रेष्ठी ने व्यक्त केले.
माथाडी कामगारांच्या न्याय-हक्कांसाठी सदैव लढण्याची तत्परता शिवसेना पक्ष संघटनेची विशेषतः असल्याने त्यांच्या हक्कासाठी सर्वपरी शक्य ते कार्य करू म्हणून इम्तियाज शेख यांनी मत व्यक्त केल .
जिल्ह्यातील अनेक कामगार , चाहत्यांनी त्यांना पुढील कारकीर्दीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.