आमदार महेंद्र थोरवे यांची शिवसेना शिंदेगटाचे   जिल्हाप्रमुख म्हणून नेमणूक

प्रतिनिधी/(साबीर शेख)

कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांची शिवसेना शिंदेगटाचे जिल्हाप्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
जिल्हाप्रमुख पदाबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना पक्षाच्या ठाणे येथील सचिव कार्यालयात देण्यात आले.

शिवसेना शिंदेगटाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे रायगड जिल्ह्यातील कर्जत आणि उरण विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हाप्रमुख पदाची जबादारी देण्यात आली आहे.

या पदाची नियुक्ती पत्रे शिंदे गटाचे राज्य विधानसभेचे प्रतोद भरत गोगावले यांच्या हस्ते देण्यात आले. त्यावेळी राज्याचे मंत्री उदय सामंत, खासदार भावना गवळी, श्रीकांत शिंदे, माजी मंत्री अर्जुन खोतकर आदी उपस्थित होते.

शिवसेना शिंदे गटाचे सचिव संजय मोरे यांच्या सहीने ते पत्र देण्यात आले असून, ही निवड वर्षभरासाठी असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.