देवद ग्राम पंचायतीच्या स्थानिकांच्या न्याय हक्कासाठी लोकशाहीच्या मार्गाने संघर्ष करू
पंचवीस हजार नागरिकांना त्रास देऊन एकाला न्याय देण्याची भूमिका चुकीची – शीतल सोनावणे
कोकण डायरी /पनवेल
एका माजी सैनिकाला शेती योग्य नसलेली जागा महसूल विभागाने देणे. त्या जागेमुळे सर्व ग्रामस्थांचा विरोध असणे असे वादीत प्रसंग भविष्यात समाजात असंतोष निर्माण करतील तर जवाबदार कोण…?
देवद येथील संबंधित माजी सैनिकाला जागा देण्यास ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध झाला.
पंचवीस हजार नागरिकांना त्रास देऊन एकाला न्याय देण्याची भूमिका चुकीची आहे असे मत सरपंच शीतल सोनावणे यांनी व्यक्त केले.
पनवेल तहसील विभागाने ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता केवळ सरकारी धाकटपशा दाखवत जागा हस्तांतरित करण्याचा घाट घातला होता. मात्र सरपंच शीतल सोनावणे सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी या कारवाईला आपला विरोध दर्शवला. त्यांना पर्यायी दुसरी जागा द्यावी अशी भूमिका सर्वांनी घेतली.
देवद ग्रामपंचायत हद्दीमध्ये वसंत नारायण मोरे या माजी सैनिकाला एक एकर जागा शेतीसाठी महसूल विभागाने २०१५साली माजी सैनिकाला दिली .त्यावेळी सादर जागा विचुंबे ग्रामपंचायत मध्ये होती. कालांतराने देवद विभागात नागरीवस्ती वाढत गेली. सध्या या जागेची पाहणी केली असता यामधील जागा नदीमध्ये गेलेली आहे.तसेच सर्व जागा खडकाळ असल्याने शेतीयोग्य जागा नसल्याचे दिसून येते. त्यामुळे २०१५ साली देखील कोणत्या निकषांखाली सदर जागा मंजूर केली ? असा अनुत्तरित प्रश्न आहे.
या संदर्भात आज सर्व पत्रकारांसमक्ष ग्रामपंचायत आणि देवद ग्रामस्थांच्यावतीने सरपंचानी खुलासा केला. या जागेमधून नवीन पनवेलला जाण्याचा पिढीजात जाण्यायेण्याचा रस्ता आहे.१९९३ साली महसूल तसेच बांधकाम विभागाने अचानक ग्रामस्थांचे स्मशान उध्वस्त केल्याने या जागेवर १९९३ पासून स्मशानभूमी आहे. मारुतीचे मंदिर आहे.
अजूनही कोणत्या प्रकारचा ताबेकब्जा न मिळता ग्रामपंचायत कडे सदर माजी सैनिक रस्ता वापरण्यासाठी महिना अडीच लाख रुपये भाड्याची मागणी करत असल्याचा खळबळजनक खुलासा देखील सरपंच शीतल सोनावणे यांनी केला.सर्व बाजूने अडचणीची तसेच ग्रामस्थांना त्रासदायक होईल अशी जागा महसूल विभागाने कोणत्या आधारावर दिली ? हाच मोठा प्रश्न आहे. आज सर्वांचा विरोध असताना त्या माजी सैनिकाला दुसरी पर्यायी जागा न देता तहसीलदार तीच जागा द्यावी असा हट्ट का करत आहेत ? असे विविध प्रश्न आहेत.
ग्रामपंचायत हद्दीमध्ये इतर कोणतीही सरकारी जागा ज्यामधून कुणाला त्रास होणार नाही अशी जागा त्यांना द्यावी असेदेखील सरपंच शीतल सोनावणे यांनी स्पष्ट केले.याचवेळी महसूल विभागाचे कर्मचारी संबंधित जागेच्या हद्दीमध्ये वसंत मोरे यांना तीच जागा देण्याचा घाट घालत होते. सरपंच शीतल सोनावणे यांनी ग्रांमपंचायत समिती सदस्य तसेच उपस्थित ग्रामस्थांसह या प्रक्रियेला व आपला तीव्र विरोध दर्शवला.सर्व कार्यवाहीचा घोषणा देत निषेध नोंदवला.गावामध्ये आग लागली कोणती दुर्घटना घडली कुणा रुग्णाला आजारात कसे न्यायचे ?एम्बुलन्स कुठून येईल ? कुणी मरण पावले तर त्याचा अंत्यविधी कुठे करायचा ?असे प्रश्न उपस्थित करून सदर जागा बदलून शासनाने दुसरी जागा द्यावी असे म्हणून या चुकीच्या धोरणा विरोधातआमरण उपोषण करण्याचा इशारा शीतल सोनावणे यांनी दिला.
जमिन ताबे कब्जा देण्यासाठी अधिकारी म्हणून नायब तहसीलदार संभाजी शेलार तसेच पोलीस प्रशासनातर्फे क्राईम पी आय वैशाली गलांडे उपस्थित होते.

माजी सैनिक वसंत नारायण मोरे यांनी तांबे कब्जा घेताना असंतुष्ट असल्याचे मत अधिकाऱ्यांसमोर मांडले