खोपोली पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांचा पहारा

पालकत्वाची भूमीका मुलांच्या वर घरा बाहेर पोलीस अधिकाऱ्यांची म्हणून समाधान वाटत ..

प्रतिनिधि/ साबीर शेख

खोपोली शहरातील शाळा आणि कॉलेज बाहेर विनाकारण फिरणार्‍या रोडरोमिओवर पोलिसांनी कारवाई केली.
मंगळवारी जनता विद्यालयाच्या आवारात फिरणारे रोडरोमीओ पकडून कायद्याची समज सोडले.
तसेच गार्डन आणि कॅफेमध्ये तपासणी करीत पुढील दिवसांमध्ये करडी नजर असणार आहे.खोपोली पोलिसांनी अचानक केलेल्या कारवाईने रोडरोमीओंचे धाबे दणाणले आहेत.

शहरात जनता विद्यालय,कनिष्ठ महाविद्यालय,के.एम.सी कॉलेज,बी.एल.पाटील तंत्रनिकेतन काँलेज आहेत.याठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहे. यादरम्यान शहारतील काही रोडरोमीओ शाळा आणि कॉलेज सुटण्याच्या वेळेत धुमस्टाईने वाहने चालवितात तर काही प्रेमयोगी गार्डन, कॅफेमध्ये चाले करतात अशा तक्रारी काही पालकांकडून पोलिसांकडे येताच पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी सागर पडधान, स्वागत तांबे,ज्योती हंबिर तसेच खोपोली वाहतूक शाखेचे संजय सताने,राहुल कोरडे यांच्यासमवेत कारवाई सुरू केली.

विनाकारण रस्त्यावर फिरणारे पळून जाताना दिसत होते यावेळी शहरातील गार्डन व कॅफे याठिकाणी देखील तपासणी करण्यात आली.पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून बेलगाम असणार्‍या रोड रोमियोंवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.