आत्महत्या विषयावर रोटरी क्लब ऑफ पनवेल सीटी व इनरव्हिल क्लब ऑफ पनवेल सिटीकडून जनजागृती अभियान.

पनवेल /किरण बाथम

रोटरी क्लब ऑफ पनवेल सीटी व इनरव्हिल क्लब ऑफ पनवेल सिटी यांच्यावतीने ओरिओन मॉल येथे पथनाट्याद्वारे “आत्महत्या” या गंभीर विषयावर जनजागृती करण्यात आली .
ओरिओन मॉलमध्ये हे पथनाट्य सादर केले गेले. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला.प्रोत्साहन फाउंडेशनचे सल्लागार व प्रख्यात मानसशास्त्रज्ञ डॉ. निल यांनी यावेळी प्रभावी मार्गदर्शन केले. आजच्या धकाधकीच्या जीवनात आणी सध्याच्या वातावरणात खुप अविश्वासनीय जीवन झाले आहे. त्यामुळे विस्कतलेले कौटुंबिक जीवन, मानवाने निसर्गाचा केलेला ह्रास आधुनिक जीवनशैली यामुळे सतत अनाकलनीय घटना घडताना आपणांस पाहायला वाचायला ऐकायला मिळतात. असं डॉ. निल म्हणाले. यावेळी आपण कोणत्या माध्यमातून आपण स्वतःला सावरावे मानसिकदृष्टया सक्षम व्हावे हे ही त्यांनी सांगितले.

रोटरी क्लबच्या अध्यक्ष ध्वनी तन्ना यांनी म्हटले की, जेव्हा आपण स्वतःबद्दल अवास्तव अपेक्षा करतो. स्वतःबाबतीत काहीही गृहीत धरतो.तेव्हा अशा अपेक्षा पूर्ण न झाल्या नंतर कुणीतरी असे आत्महत्या करतात. पण आत्महत्या मार्ग नव्हे आत्महत्या का करू नये याचे भान देणं हा मार्ग आहे असे त्या म्हणाल्या.

रोटरी क्लब ऑफ पनवेल सीटी व इनरव्हिल क्लब ऑफ पनवेल सिटीचे ध्वनी तन्ना, हर्मेश तन्ना, डॉ. फोरम ठक्कर, डॉ. वैभव ठक्कर, सिम्पल अंचंलीया, हेतल बालड, गिरा चौहान, वैशाली कटारिया, बिजल मीरानी, वैशाली ठक्कर व ममता ठक्कर आदींनी या उपक्रमासाठी विशेष योगदान दिले.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.