बॅरिस्टर ए .आर. अंतुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आंबेत येथील समाधीस्थळी विनम्र अभिवादन
अंतुले साहेबांचे अपुरे कार्य पुढे नेण्यासाठी सदैव तत्पर राहू- अभिजीत पाटील
पनवेल दि.१२ (वार्ताहर) :
राज्याचे माजी मुख्यमंत्री, कोकणचे भाग्यविधाते बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांच्या आज स्मृतिदिनानिमित्त पनवेल शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभिजीत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुदाम पाटील, रोजगार व स्वयंरोजगार विभाग पनवेल शहर जिल्हाध्यक्ष भाई म्हात्रे व प्रताप गावंड यांनी आंबेत येथे बॅ ए आर अंतुले यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आदरांजली वाहिली.
तसेच बॅ ए आर अंतुले यांच्या आंबेत येथील निवासस्थानी तसेच श्रीवर्धन, म्हसळा तालुक्याला भेट देऊन माजी आमदार मुश्ताक अंतुले यांच्यासह काँग्रेसच्या पुढील वाटचालीबाबत व बॅ ए आर अंतुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांबद्दल सविस्तर चर्चाही केली. आंबेत येथील बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्या समाधीस्थळी अंतुले यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्याप्रती कृतज्ञताही व्यक्त करण्यात आली.