नगरसेवक निधीतून बांधण्यात येणाऱ्या खुली व्यायामशाळेचे प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
पनवेल :
विरोधी पक्ष नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या हस्ते पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी महाविकास आघाडीच्या नगरसेवकांच्या नगरसेवक निधीतून बांधण्यात येणाऱ्या खुली व्यायामशाळेचे भूमिपूजन रोजी पार पडले.
विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्या नगरसेवक निधीतून पनवेल शहरातील पयोनियर, पाण्याच्या टाकी शेजारी, बांधण्यात येणाऱ्या खुली व्यायामशाळेचे भूमिपूजन, नगरसेविका डॉ.सुरेखा मोहोकर यांच्या नगरसेवक निधीतून प्रभाग क्र.१८ येथे विविध ठिकाणी उभारलेल्या हायमास्ट चे लोकार्पण, नगरसेविका कुसुम गणेश पाटील यांच्या नगरसेवक निधीतून खांदा कॉलनी येथील सेक्टर ६, विरंगुळा केंद्र, अष्टविनायक हॉस्पिटल शेजारी बांधण्यात येणाऱ्या खुली व्यायामशाळेचे भूमिपूजन, नगरसेविका सारिका अतुल भगत यांच्या नगरसेवक निधीतून खांदा कॉलनी येथील मूळगंधकुटी बुद्धीविहार समोर बांधण्यात येणाऱ्या खुली व्यायामशाळेचे भूमिपूजन, नगरसेवक शंकर पाटील यांच्या नगरसेवक निधीतून कामोठे येथील सेक्टर ५ गार्डन बांधण्यात येणाऱ्या खुली व्यायामशाळेचे भूमिपूजन, नगरसेविका कमल महादेव कदम यांच्या नगरसेवक निधीतून कळंबोली शहरातील के.ग्रुप मैदान, सेक्टर ३, सी.ग्रुप मैदान, सेक्टर ३ व छत्रपती शिवाजी महाराज राजे मैदान, सेक्टर २ ई येथे बांधण्यात येणाऱ्या खुली व्यायामशाळेचे भूमिपूजन व सेक्टर २ हनुमान मंदिर येथे बांधण्यात येणाऱ्या पाणपोईचे भूमिपूजन, नगरसेविका प्रज्योती प्रकाश म्हात्रे यांच्या नगरसेवक निधीतून टेंभोडे बस स्टॉप शेजारी, नवीन पनवेल सेक्टर ६, खिडुकपाडा, साई मंदिर शेजारी व आसूडगाव शाळेचा मैदान येथे बांधण्यात येणाऱ्या खुली व्यायामशाळेचे भूमिपूजन, नगरसेविका उज्वला विजय पाटील यांच्या नगरसेवक निधीतून तोंडरे, विठ्ठल रखुमाई मंदिर शेजारी बांधण्यात येणाऱ्या खुली व्यायामशाळेचे भूमिपूजन पार पडले.
यावेळी विरोधी पक्ष नेते प्रितम जनार्दन म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणीस .गणेश कडू, मा.उपनगराध्यक्ष .गणेश पाटील, पनवेल अर्बन बँक संचालिका श्रीमती.माधुरी गोसावी, नगरसेवक श्गोपाळ भगत, कामगार नेते . प्रकाश म्हात्रे, नगरसेवक .सखाराम पाटील, .नगरसेवक .शंकर म्हात्रे, .नगरसेवक .प्रमोद भगत, .नगरसेवक .डी.पी.म्हात्रे, नगरसेविका डॉ.सुरेखा मोहोकर, नगरसेविका सौ.कुसुम पाटील, नगरसेविका सौ.कमल महादेव कदम, नगरसेविका सौ.प्रीती जॉन्सन जॉर्ज, नगरसेविका सौ.सारिका अतुल भगत, नगरसेविका सौ.उज्वला विजय पाटील, नगरसेविका सौ.प्रिया विजय भोईर तसेच शेकाप पदाधिकारी, कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक, महिला मंडळ व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.