ओबीसींवर अन्याय केल्यानेच सरकार अडचणीत
ओबीसी मोर्चा महामंत्री खासदार संगमलालजी गुप्ता यांची टीका
पनवेल( प्रतिनिधी): महाराष्ट्रात ओबीसी समाजावर अन्याय केल्याने शिवसेनेचे सरकार शेवटच्या घटका मोजत असल्याचे दिसत आहे. लवकरच भारतीय जनता पक्ष येथे सत्तेवर आलेले दिसेल, असे प्रतिपादन ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री खासदार संगमलालजी गुप्ता यांनी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महिला संपर्क प्रमुख व युवक संपर्क प्रमुख यांची राज्यस्तरीय बैठकीत बुधवारी (दि. 29) पनवेल येथे संपन्न झाली.

श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ हॉलमध्ये बुधवारी भाजपच्या ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महिला संपर्क प्रमुख व युवक संपर्क प्रमुख यांची राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली. या वेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार हंसराज भैय्या अहिर, प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर, उपाध्यक्ष आमदार डॉ. संजय कुटे, लोकनेते रामशेठ ठाकूर, प्रदेश उपाध्यक्ष अॅड. मनोज भुजबळ, हरिश्चंद्र भोईर, सरचिटणीस बापुजी घडामोडे, शंकरराव वाघ, रामजी खरपुरिया, संजय गाते, प्रदेश महिला संपर्कप्रमुख वनिता लोंढे, उत्तर रायगड ओबीसी महिला अध्यक्षा उपमहापौर सीताताई पाटील, उत्तर रायगड ओबीसी अध्यक्ष राजेश गायकर, ओबीसी मोर्चा युवक प्रदेश संपर्क प्रमुख करण पोरे, म्हाडाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील उपस्थित होते.
या वेळी बोलताना ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री खासदार संगम लालजी गुप्ता यांनी, महाराष्ट्रातील ओबीसी महिला मोर्चाचे संघटन पाहून मी असे संघटन देशात करण्याचे ठरवले आहे. ओबीसी मोठा समाज असून देशाची दशा आणि दिशा बदलण्यात त्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. भाजपने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्यासाठी ओबीसी मार्चा स्थापन केला.
https://youtu.be/jZmWYFU-ZR8
देशात 52 टक्क्यापेक्षा जास्त असलेल्या या समाजाचे नेतृत्व करताना प्रत्येक समाजाला भारतीय जनता पक्षाला जोडण्याची जवाबदारी आहे. महाराष्ट्रात ओबीसी समाजावर अन्याय झाल्याने शिवसेनेचे सरकार शेवटच्या घटका मोजत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रदेश अध्यक्ष योगेश अण्णा टिळेकर, देशात ओबीसी समाज 52 टक्क्यापेक्षा जास्त आहे या समाजात 15 टक्के महिला आहेत, 35 टक्के युवक आहेत, त्यांचे संघटन करण्याची परवानगी देवेंद्र फडणवीस यांनी दिली आणि दोन वर्षात हे मोठे संघटन उभे राहिले हेच या ओबीसी मोर्चाचे सर्वात मोठे यश आहे.
काँग्रेसने कायम ओबीसींविरुध्द राजकारण केले. व्ही. पी. सिंग सरकारने मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्यावर आपल्याला मिळाले. त्यामुळे ओबीसी बांधवांचे राज्यातले राजकीय नेतृत्व तयार झाले. महाविकास आघाडी सरकारने प्रथम मराठी समाजाचे त्यानंतर आपला विश्वासघात केला.
भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष नगरसेवक मनोज भुजबळ यांनी भाजप हा ओबीसी समाजाला संधी देणारा पुढे नेणार पक्ष असल्याचे सांगितले.