भाजपच्या अनेक योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन
नेरळ – वार्ताहर
भारतीय जनता पार्टीच्या वतीने बुथ अध्यक्ष आणि शक्तीकेंद्र प्रमुख यांच्या मेळाव्याचे आयोजन शुक्रवार दि. २२ ऑक्टोंबर रोजी कर्जत साईकृपा शेळके मंगल कार्यालय किरवली येथे करण्यात आले होते. यावेळी कर्जत तालुक्यातील २०० बुथ अध्यक्ष आणि ५० शक्तीकेंद्र प्रमुख यांच्यासह कर्जत तालुक्याती तसेचे रायगड जिल्हयातील अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी रायगड जिल्हयाचे माजी पालकमंत्री, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आमदार रविद्रजी चव्हाण हे उपस्थित होते. त्यांनी कार्यकर्त्यांना मागदर्शन केले. यावेळी ते बोलताना म्हणाले, आगामी नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका शत प्रतिशत भाजपा हा मंत्र घेवून आपण जनतेसमोर जावू अणि भारतीय जनता पक्षाचे जास्तीत जास्त सदस्य जिल्हा परिषदेत आणि पंचायत समितीमध्ये पाठवू असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

यावेळी कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले की, मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने सर्व सामान्य माणसाचा विचार करून अनेक योजना दिल्या आहेत. कोरोना काळात दिली जाणारी मोफत लस असो की, गरीब कल्याण योजनेअंतर्गत सर्व सामान्य जनतेला धान्य वाटप असो किंवा प्रधानमंत्री आवास योजनेतून गोरगरिबांना घरे देणे, शेतकर्‍यांना दिलासा देणारी किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना २००० च्या ३ हप्त्यात ६००० रूपये रक्कम डीबीटीच्या माध्यमातून दिली.

महिला भगिनींना उज्वल गॅस योजनेअंतर्गत मोफत गॅस कनेक्शन, मुद्रा योजनेमधून होतकरू तरूणांना व्यावसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिले. या अनेक योजना राबविल्या गेल्या. या  सर्व योजना घेवून भाजपा कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत गेले पाहिजे. त्यांनी त्याचा लाभ मिळवून दिला पाहिजे. या मेळाव्यात भारतीय जनता पक्ष कर्जत तुक्यात मोठया प्रमाणात घोडदैड करीत असल्याचे प्रतिपादन यावेळी निरंजन डावखरे यांनी केले.

यावेळी कर्जत तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर, जिल्हा सरचिणीस दिपक बेहरे, पनवेल महानगरपलिकेचे नगगरसेवक प्रकाश बिनेदार, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, नितीन कांदळगावकर, सुनिल गोगटे, सरचिटणीस राजेश भगत, संजय कराळे, बिनीता घुमरे, संतोश भोईर, प्रमोद पाटील, नगरसेवक बळवंत घुमरे, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, माथेरान उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, माथेरान अध्यक्ष प्रविण सकपाळ, नेरळ महिला शहराध्यक्ष नम्रता कांदळगावकर, कर्जत तालुका महिला मोर्चा अध्यख स्नेहल गोगटे, मृणाल खेडेकर, केशव तरे, रोशन पाटील,राहूल कुलकर्णी, श्रध्दा कराळे, सुप्रिया भगत, राजन लोभी, संतोष शिंगाडे, सरीता पादीर, राहून कुलकर्णी, नगगसेविका स्वामीनी मांजरे आदी यावेळी उपस्थित होते.

या कार्यकर्त्यांनी केला आ. निरंजन डावखरे यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश अनिल मिरकुटे, राजेंद्र वाघमारे, रवींद्र जाधव, विजय जाधव, प्रकाश मिरकुटे, सुनील वाघमारे, अजय वळवी, राजेश मुकणे, मंगेश वाघमारे, नितीन मिरकुटे, अभिषेक वाघमारे, लक्ष्मण मुरकुटे, ऋतिक हीलम, करण वाघमारे, विनोद कातकरी, कैलास मुकणे, अंकुश वळवी, हरेश वाघमारे, बाळ वारे, राजीक खान, प्रतीक बांगर, गणेश पवार, स्वप्निल वळवे, सुनील वाघ, आकाश वळवी

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.