आदिवासी भगिनींसोबत विशेष भाऊबीज सोहळ्यात ४४८ आदिवासी भगिनींना भावाची भेट म्हणून साडी, चोळी आणि दिवाळी फराळाची भेट.

Date – २६/१०/२९२२

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यांमधील भौतिक सोयी सुविधांपासून वंचित असलेल्या व अतिशय दुर्गम भागातील आदिवासी भगिनींसोबत विशेष भाऊबीजेचा कार्यक्रम ग्रामीण आणि आदिवासी भागात समाज कार्यात अग्रेसर असणाऱ्या कोकण कट्टा आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्था पनवेल या सामाजिक संस्थांच्या वतीने आज दिनांक २६ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला होता.

आदिवासी भगिनींसोबत विशेष भाऊबीज

रायगड जिल्ह्यातील कोकण कट्टाचे संस्थापक अध्यक्ष अजित पितळे आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण संतोष ठाकूर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ह्या आदिवासी भगिनींसोबत विशेष भाऊबीज सोहळ्यात ४४८ आदिवासी भगिनींना भावाची भेट म्हणून साडी, चोळी आणि दिवाळी फराळ देण्यात आले.

यावेळी दुर्लक्षित असलेल्या अनेक आदिवासी वाड्यांवरील आदिवासी महिलांना दिवाळी सणानिमित्त नवीन साडी चोळी विकत घेता येत नाहीत.

तसेच आर्थिक विवंचनेमुळे कित्येकांच्या घरात दिवाळीचे फराळ देखील बनत नाहीत. त्यासाठी आदिवासी भगिनींसोबत हा विशेष भाऊबीज कार्यक्रम आयोजित केला गेला. यावेळी मोठ्या उत्स्फूर्त रित्या विविध आदिवासी वाड्यांवरील भगिनींनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.