आज देशभरात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना इतिहासातील दोन महत्वाच्या तारखा

२६ नोव्हेंबर १९४९
२६ जानेवारी १९५०

२६ नोव्हेंबर १९४९ ला आपण संविधानाचा स्वीकार केला. आणि २६ जानेवारी १९५० संविधान संपूर्ण देशभरात लागू करण्यात आले . म्हणून २०२१ हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचे अमृत वर्ष (७५) म्हणून साजरा करीत आहोत.
जर संविधान नसते तर आज अमानुष ता, गुलामी, जनवरांपेक्षा वाईट परिस्थिती आपली असती अफगाणिस्थान ची अवस्था आपण पहात आहात.संविधान नसते तर पाकिस्तान सारखी अराजकता माजली असतील, रशिया सारखे वारंवार युध्दाचे प्रसंग आले असते. संविधान आहे म्हणून आज. आपण स्वाभिमानाचे जीवन जगत आहोत , म्हणूनच आजचा दिवस अभिमानाचा आहे.अमेरिकेची राज्यघटना ही फक्त ७ कलमाची आहे.ती लिहिण्यासाठी त्या अमेरिकन घटनाकाराला ४ महिने लागले. कॅनडा देशाची राज्यघटना ही १४७ कलमाची आहे ती लिहिण्यासाठी दोन वर्ष पाच महिने लागले. ऑस्टोलिया देशाची राज्यघटना ही १५३ कलमाची आहे ती बनविण्यासाठी चक्क ९ वर्ष लागले.आणि सर्वात महत्वाचे भारतीय राज्य घटना ही ३९५ कलमाची आहे, इतर राष्ट्रांना कमी कलमे असून २ ते ९ वर्ष लागतात तर ३९५ कलामाच्या घटनेला किती वर्ष लागतील याची कल्पना करा. एवढी मोठी घटना एकट्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी फ्कत २ वर्ष ११ महिने १८ दिवसात पूर्ण केली एवढया कमी कालावधी मध्ये लिहीली हे समजून घेतले पाहिजे. घटना लिहिणे म्हणजे एखादे पुस्तक लिहिणे नव्हे. संविधान लिहिताना देशातील सर्व राज्यातील त्या त्या साकृतिक बोली भाषेचा, रुढी परंपरा, जाती धर्माचा, त्या राज्यातील शेती, पाळीव प्राणी, पशुपक्षी, तेथील लोकांचे व्यवसाय, सन उत्सव, त्या राज्याची आर्थिक, सामजिक, राजकीय, भौगोलिक ऐतिहासिक याचा अभ्यास करावा लागतो.आपल्या देशात तर ६५०० पेक्षाही जास्त जाती आहेत.डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. ते प्रत्यक्ष पेन कागद घेऊन घटना लिहीत आणि ते डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या समितीपुढे मांडायचे. बैठक घेऊन लिहीलेल्या चर्चा,विचार विमर्श व्हायचे. अनेक प्रश्न विचारले जायचे .सर्व प्रेश्र्नाना उत्तरे देऊन मग ते कलम निश्चित केले जायचे. अनेकवेळा समितीचे सदस्य उपस्थित नसल्याने त्या बैठका पुढे ढकलल्या जात.किंवा सदस्यांचा आक्षेप असला की पुढील बैठक बोलावली जायची. अशा प्रकारे भारतीय राज्य घटनेला २ वर्ष ११ महिने १८ दिवस लागले.इतर देशांच्या घटनेच्या वेळेपेक्षा आपल्या घटनेचा कालावधी फारच कमी आहे. ३९५ कलम असलीली राज्य घटना ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे…

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.