रामदास शेवाळे प्रतिष्ठानच्या वतीने
कळंबोली येथे दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा
https://youtu.be/yfsQCYHHJSQ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच सरकार म्हणजे आपले सरकार सर्वसामान्यांचे सरकार… महानगर प्रमुख शिवसेना रामदास शेवाळे
पनवेल / प्रतिनिधी:-  गोकुळाष्टमी निमित्ताने अनेक ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने शक्ती प्रदर्शन करत हिंदू संस्कृतीच्या पारंपरिक लोकप्रिय दहीहंडी उत्सवाला जल्लोषात साजरा केला.
पनवेल कळंबोली भीमा कॉम्प्लेक्स येथे शिंदे यांचे कट्टर समर्थक रामदास शेवाळे यांच्या नावाने असलेल्या प्रतिष्ठानने  मुख्यमंत्री चषक मोठ्या दिमाखात हा उत्सव भरवला होता.
 बिमा नाक्यावर दहीहंडीचे आयोजनात. मुंबई नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील गोविंदा पथक या ठिकाणी उंच थर लावून या उत्सवाचा थरार उपस्थिती तांनी संगीतमय वातावरणात अनुभवला.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड करत राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली  सर्वसामान्यांचे सरकार स्थापन झाले हिंदू संस्कृतीतील पारंपारिक सर्वसानांच्या वर लादण्यात आलेल्या मर्यादा आपल्या सरकारने शिथील करून त्या सर्वसामान्यांच्या भावनांचा आदर करत प्रत्येक हिंदू सणाला मनसोक्तपणे  त्यांच्या भावनेतून साजरी करण्यासाठी आपल्या सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे.  त्यात गोविंदा पथकां साठी त्यांना विशेष अटी शर्तीनुसार सहाय्य निधी व रोजगार निर्माण करण्याच आदेश काढण्यात आला आहे.
सर्वसामान्यांचे सरकार एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून राज्याला न्याय देईल अशी मी सदिच्छा व्यक्त करतो असे रामदास शेवाळे यांनी प्रसारमाध्यमांसमोर मत मांडले.
 रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली अनेक पदाधिकारी शिंदे गटामध्ये आले आहेत. लवकरच पनवेल मधील एकनाथ शिंदे यांचे समर्थक मोठे राजकीय  शक्तिप्रदर्शन करणार आहेत. तत्पूर्वी दहीहंडी च्या निमित्ताने रामदास शेवाळे प्रतिष्ठाने एकनाथ शिंदे
यांच्या नावाने हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला .
कळंबोलीतील बिमा नाक्यावर मोठ्या प्रमाणात
शिंदे यांचे बॅनर लावले आहेत. त्याचबरोबर कळंबोली आणि पनवेल परिसरात त्यांचे फोटो बॅनर वर झळकत आहेत. मुख्यमंत्री चषक आणि रोख रकमेचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे.
प्रतिष्ठानचे पदाधिकारी गेल्या दहा दिवसांपासून या
दहीहंडी उत्सवाचे नियोजन करीत आहेत.
दोन वर्ष पारंपारिक दहीहंडी उत्सव !
रामदास शेवाळे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी
कळंबोलीत दहीहंडी उत्सव साजरा केला जातो.
परंतु गेले दोन वर्ष कोरोना असल्याने या उत्सवावर
बंदी घालण्यात आली होती. मात्र प्रतिष्ठानने
नाक्यावरील मारुती मंदिरा मध्ये पारंपारिक
पद्धतीने कृष्ण जन्माष्टमी साजरी केली.
रामदास शेवाळे प्रतिष्ठानच्या व्यासपीठावर दहीहंडी उत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक राजकीय मंडळींनी उपस्थिती लावली होतीत्यात  राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, रिपीआयचे जिल्हाध्यक्ष माजी उपमापोर जगदीश भाई गायकवाड, नगरसेविका विद्याताई गायकवाड अन्य नामावंत राजकीय सामाजिक व्यवस्थेतील विशेष अतिथी यावेळी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत फाळके यांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव यशस्वी व्हावा या दृष्टिकोनातून कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.