ता.पनवेल, दिनांक 14 ऑक्टोबर 2017 रोजी बाल कल्याण समिती, रायगड यांच्या आदेशाने 1) कु.सनी संजय दिगडे वय 14 वर्षे, 2) शुभम संजय दिगड़े वय 13 वर्षे, 3) संध्या संजय दिगडे वय 16 वर्षे राहणार रुम नंबर 6, विजय सोसायटी, सेक्टर 5, आसुडगाव, ता.पनवेल, जि.रायगड या तीन बालकांस पंचदिप संकुल बालग्राम, पनवेल, जि.रायगड या संस्थेत दाखल करण्यात आले आहे.
कु.संध्या संजय दिगडे ही सध्या 18 ऑगस्ट 2021 रोजी बाल कल्याण समिती, रायगड यांच्या आदेशाने स्वप्नालय मुलींचे बालगृह, पनवेल या संस्थेत दाखल आहे.
ही बालके निराधार असून या बालकाचे आई-वडील दोघेही मयत झालेले आहेत. बालके यांच्या आजी सोबत राहत होती परंतु त्यांची आजी काहीही कामधंदा करीत नाही तसेच तिला दारुचे व्यसन आहे. या बालकांस त्यांची आजी व मामा हे त्यांचे पालन पोषण न करता उलट त्यांना त्रास देत होते तसेच त्यांचे पालन पोषन करण्यास असमर्थ आहेत. ही बालके ही सौ. वंदना प्रदिप जाधव राहणार रुम नंबर 16, विजय सोसायटी, सेक्टर 5, आसुडगाव, ता. पनवेल, जि. रायगड यांच्यामार्फत खांदेश्वर पोलिस ठाण्यामध्ये आली होती. खांदेश्वर पोलिसांनी बालकांस काळजी व संरक्षणाची गरज असल्याने बाल कल्याण समिती यांच्या आदेशाने संस्थेत दाखल केले होते.
ता. पनवेल, दिनांक रोजी 18 ऑगस्ट 2012 रोजी बाल कल्याण समिती, रायगड यांच्या आदेशाने कु.अनुराधा अनुसया वय 16 वर्षे राहणार कळंबोली, ता.पनवेल या बालिकेस पंचदिप संकुल बालग्राम, पनवेल, जि.रायगड या संस्थेत दाखल करण्यात आले आहे. कु.अनुराधा अनुसया ही सध्या दिनांक 18 ऑगस्ट 2012 रोजी बाल कल्याण समिती, रायगड यांच्या आदेशाने स्वप्नालय मुलींचे बालगृह, पनवेल या संस्थेत दाखल आहे.
कु. अनुराधा अनुसया ही निराधार असून या बालिकेचे आई-वडील दोघेही रस्ते अपघातामध्ये मयत झालेले आहेत. या अपघातादरम्यान बालिका कळंबोली पोलिसांना मयत आई-वडिलांजवळ सापडली होती. पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये कु.अनुराधाचे इतर कोणीही नातेवाईक नसल्याचे समजले त्यामुळे कळंबोली पोलिसांनी बालिकास काळजी व संरक्षणाची गरज असल्याने बाल कल्याण समिती यांच्या आदेशाने पंचदिप संकुल बालग्राम, पनवेल या संस्थेत दाखल केले होते.
तरी या बालकांचे नातेवाईक/पालक असल्यास त्यांनी अधीक्षक, पंचदिप संकुल बालग्राम, प्लॉट नं. 6, सेक्टर 12, सीकेटी कॉलेज समोर, खांदा कॉलनी, नवीन पनवेल, जि.रायगड 410206 मो.नं. 7208085005 किंवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, रायगड अलिबाग दूरध्वनी क्रमांक 02141- 295321 येथे संपर्क साधावा, असे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी विनित म्हात्रे यांनी कळविले आहे.